आरशात स्वत:चाच चेहरा पाहून घाबरला माकड, त्यानंतर त्यानं जे केलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळताता, जे आपलं मनोरंजन करतात.

Updated: Oct 15, 2021, 07:41 PM IST
आरशात स्वत:चाच चेहरा पाहून घाबरला माकड, त्यानंतर त्यानं जे केलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळताता, जे आपलं मनोरंजन करतात. म्हणून आपण त्याला आनंदाने पाहातो आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करतो. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ आपल्याला शिकवण देतात तर काही व्हिडीओ आपल्याला काही ना काही माहिती देतात. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की, तो तुमचा दिवस बनवू शकतो.

हा मजेदार व्हिडीओ एका माकडाचा आहे. व्हायरल होणाऱ्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इकडे -तिकडे उड्या मारत असताना माकड एक अचानक दुचाकीच्या वर बसला. काही क्षणांनंतर तो बाईकवरच्या आरशांसोबत खेळू लागला.

आपण पाहू शकता की माकडाची नजर आरश्यावर पडताच, तो स्वतःचा चेहरा पाहून दचकला. हा माकड आरशात स्वत:लाच पाहून विचित्र तोंड करत आहे आणि त्यानंतर आरशातील त्याची प्रतिमा त्याच्याप्रमाणे करतेय हे पाहून तो आश्चर्य होतो आणि दचकतो.

मजेदार व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, आरशात माकड स्वतःचा चेहरा पाहून तो अचानक घाबरतो आणि लगेच तो मागे होतो. मात्र, माकड पुन्हा एकदा त्या आरशात आपला चेहरा पाहतो. आणि निट पाहण्याचा प्रयत्न करतो. तो स्वत:ला दात दाखवतो, तोंड वाकडं करुन दाखवतो आणि मग पुन्हा घाबरतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

माकडाचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला गेला आहे, जिथे नेटिझन्स मोठ्याप्रमाणावर कमेंट्स करत आहेत, तर काही लोकं त्या माकडाला आपल्या मित्र्याशी कंपेअर करत आहेत. तर काही लोकं आपल्या मित्राला कमेंटमध्ये मेंशन करत आहे.