जगभरात आतापर्यंत १.४२ कोटी लोकांना कोरोनाची लागण, ६ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा कहर कायम

Updated: Jul 19, 2020, 12:35 PM IST
जगभरात आतापर्यंत १.४२ कोटी लोकांना कोरोनाची लागण, ६ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू title=

वॉशिंग्टन : कोरोना ही महामारी अजूनही नियंत्रणात आलेली नाही. जगभरात अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत जगभरात ६ लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉप्किन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीपर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1,40,103 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये 78,772 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटेनमध्ये 45,358 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात 1 कोटी 42 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी फक्त 37 लाख लोकं ही अमेरिकेतील आहेत. ब्राझीलमध्ये 20 लाख तर भारतात 10 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात जगात सर्वाधिक 2,59,848 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासात भारतात विक्रमी वाढ झाली आहे. शनिवार सकाळी ८ वाजेपासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशात 38,902 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशात कोरोना संक्रमितांची संख्या 10,77,618  झाली आहे. एका दिवसात 545 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 26818 लोकांनी आपली जीव गमवला आहे.