मुंबई : रंग बदलणारा पक्षी तुम्ही कधी पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल की, रंग बदलणारा सरडा आम्ही पाहिला आहे. पण हे पक्षी काय आहे? रंगीबेरंगी पक्षी देखील ठिक आहे. पण रंग बदलणारा पक्षी हे काय नेमकं प्रकरण आहे? तर त्यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल होणारा पक्षी पाहावा लागेल. ज्यामुळे तुमच्या मनातील प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात एखाद्या युनिक गोष्टीला लोक सर्वात जास्त शेअर आणि लाईक करत असतात. आता अशाच एका प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.
हो हे खरं आहे. कारण या व्हिडीओमध्ये तुम्हाला रंग बदलणारा पक्षी पाहायला मिळेल, हा पक्षी खूपच सुंदर आहे आणि त्याच्या अंगावरचे बदलणारे रंग देखील पाहण्यासारखे आहेत
खरं तर, या पक्ष्याच्या पंखांमध्ये ही अनोखी किंवा विचित्र शक्ती आहे, ज्याचा रंग सरड्यासारखा बदलतो.
या अनोख्या पक्ष्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल. हा गुंजार पक्षी माणसाच्या हातावर बसला आहे, जो हळूहळू चमकदार गुलाबी होण्यापूर्वी त्याचा रंग गडद हिरव्यापासून काळ्यामध्ये बदलतो.
The stunning colors of the Anna's hummingbird are iridescence caused by light scattering from nanoscale structures within their feathers.pic.twitter.com/BZzXuFnHag
— Wonder of Science (@wonderofscience) July 21, 2022
पक्षी आपले डोके वेगवेगळ्या दिशेने वळवल्यानंतर हे सर्व रंग बदलतात. यामुळेच ज्या-ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तो व्यक्ती हा व्हिडीओ पाहातच राहिला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ वंडर ऑफ सायन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला इंटरनेट नेटिझन्सकडून भरभरून प्रेम मिळत आहे. आत्तापर्यंत तो इंटरनेटवर सुमारे 3 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे आणि इंटरनेट वापरकर्ते या व्हिडिओवर त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.