कानपूर : ८ पोलिसांच्या हत्याकांडातील मोस्ट वॉन्टेड आरोपी विकास दुबे याला मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विकास दुबे याने महाकालेश्वर मंदिरात पावती फाडली आणि त्यानंतर आत्मसमर्पण केले. सध्या स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. विकास दुबे यांच्या अटकेची माहिती यूपी पोलिसांनी दिली आहे.
#WATCH Madhya Pradesh: After arrest in Ujjain, Vikas Dubey confesses, "Main Vikas Dubey hoon, Kanpur wala." #KanpurEncounter pic.twitter.com/bIPaqy2r9d
— ANI (@ANI) July 9, 2020
विकास दुबेने आत्मसमर्पण केल्याची स्थानिक माध्यमांना माहिती दिली होती. यानंतर उज्जैनच्या महाकाळ पोलीस ठाण्याजवळ त्यांनी स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपी विकास दुबे याला अटक केली असून त्याला महाकाल पोलीस ठाण्यात आणले आहे. आत्मसमर्पण केल्याच्या बातमीनंतर एसटीएफची टीम उज्जैनला रवाना झाली आहे.
#WATCH Madhya Pradesh: Vikas Dubey, the main accused in #KanpurEncounter case, has been arrested in Ujjain pic.twitter.com/pmh5rwl3Z4
— ANI (@ANI) July 9, 2020
विकास दुबे महाकाल मंदिरासमोर उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक मीडिया तेथे पोहोचताच त्याने मी विकास दुबे असल्याचं ओरडून सांगितलं. यानंतर स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाली. त्याला तातडीने अटक करण्यात आली आणि थेट महाकाल पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे त्याची चौकशी केली जात आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, 'सध्या विकास दुबे मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. अटक कशी झाली? याबद्दल काही बोलणे योग्य नाही. मंदिराच्या आतून किंवा बाहेरुन अटक केल्याबद्दल देखील सांगणे योग्य नाही. त्याने सुरुवातीपासूनच क्रौर्याची मर्यादा ओलांडली होती. घटनेबाबत आम्ही पोलिसांना सतर्क ठेवले होते.'
२ जुलैच्या रात्री आठ पोलिसांच्या हत्येत आरोपी असलेला विकास दुबेच्या शोधात संपूर्ण उत्तर प्रदेशला छावणीचं रुप आलं होतं. असे असूनही, विकास दुबे यूपी पोलिसांना सापडला नाही.
यूपी पोलिसांच्या पथकाने दिल्ली-एनसीआरमध्ये तळ ठोकला असता विकास दुबे उज्जैन येथे पळून गेला. आता प्रश्न असा आहे की, विकास दुबे उज्जैनला कसा पोहोचला. त्याला कोणी मदत केली? सध्या तरी यूपी पोलिसांची टीम त्याला ताब्यात घेण्यासाठी उज्जैनला रवाना झाली आहे.