आई मुलात कधीही करार होत नाही, पण या ६ वर्षाच्या मुलासोबत आईचा असा करार ...पाहा

आई आणि मुलात कधी करार होतो का?, पण या आईने ६ वर्षाच्या मुलासोबत असा लिखित करार केला..पाहा काय आहे हा करार?

Updated: Feb 4, 2022, 08:03 PM IST
आई मुलात कधीही करार होत नाही, पण या ६ वर्षाच्या मुलासोबत आईचा असा करार ...पाहा title=

नवी दिल्ली : आईसारखं या जगात दुसरं कुणीच नाही म्हणतात ते अगदी खरं आहे. कधी गोड बोलू तर कधी ओरडून तर कधी योग्य टिकटॅक वापरून आई मुलांकडून तिला हवं ते योग्य पद्धतीनं करून घेत असते. आपल्या मुलाचं मन न दुखवता त्याच्यावर संस्कारही करते आणि त्यातून त्याला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञानही देत असते. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती एक सुपर आईची. कारण या आईनं आपल्या लेकासोबत अनोखा करार केला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रत्येक मुलाची आई विशिष्टं टाईम टेबल तयार करत असते. मात्र ते बऱ्याचदा फॉलो होत नाही. हेच मुलाकडून करून घेण्यासाठी आईनं एक युक्ती वापरली आहे. सोशल मीडियावर आईनं तयार केलेल्या टाईम टेबलची खूप चर्चा होत आहे. 

आईनं आपल्या 6 वर्षांच्या मुलासाठी एक अजब टाईम टेबल तयार केलं आहे. या टाईम टेबलसोबत एक करार देखील केला आहे. हा करार सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये खाली आईनं दिलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे. 

6 वर्षांच्या चिमुकल्यासाठी अनोखं रुटीनरेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अकाऊंटवर टाइम टेबलचा फोटो तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. या टाइम टेबलमध्ये अशा काही गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत, ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये, 'मी आणि माझ्या 6 वर्षाच्या मुलाने आज एक करार केला आहे, जो त्याच्या टाईम टेबल आणि परफॉर्मन्स लिंक्स बोनसवर आधारित आहे.' म्हणजेच, आईने मुलाच्या संमतीने टाईम टेबल तयार केलं आहे, ज्यामध्ये खेळणे, आहार आणि इतर गोष्टींचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे.

हे टाईम टेबल सकाळी 7.50 वाजल्यापासून सुरू रात्री 10 पर्यंत आहे. यामध्ये खाण्याच्या वेळा पाळणं, टीव्ही पाहाणं, खेळणं, सफसफाई करणं आणि झोपणं अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी नियोजन करण्यात आलं आहे. आता सर्वात शेवटच्या दोन ओळी फार महत्त्वाच्या आहेत.

न आरडोओरडा करता, तोडफोड न करता जर दिवसभर हे टाईम टेबल फॉलो केलं तर 10 रुपये मिळणार आहेत. तर न भांडता आणि न आदळ आपट करता शांतपणे सतत आठवण करून न देता स्वत: चं स्वत: हे टाईम टेबल जर 7 दिवस फॉलो केलं तर 100 रुपये मिळणार आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी या करारला आईक केलं आहे. अनेकांना ही आयडीया आवडली आहे. आईचा हा करार सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे.