Mother Dairy : मदर डेअरीने (Mother Dairy) पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.कंपनीने फुल क्रीम (full-cream) आणि टोकन दुधाच्या (token milk) दरात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दरम्यान याआधी नोव्हेंबर महिन्यात देखील मदर डेअरीने दुधाचे दर वाढवले होते. त्यामुळे सततच्या दरवाढीने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाच्या दर पुन्हा वाढवले आहेत. त्यामुळे आता मदर डेअरीचे दूध घेण्यासाठी ग्राहकांना आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे. येत्या सोमवार पासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मदर डेअरीने (Mother Dairy) फुल क्रीम (full-cream) दुधाच्या दरात लिटरमागे 1 रुपयाने वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता फुल क्रीम दुधावर 1 रुपया वाढल्यानंतर एक लिटर दुधासाठी 63 ऐवजी 64 रुपये मोजावे लागणार आहेत. तर टोकन दुधाच्या (token milk) दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे टोकन दुध 48 रुपयांवरून 50 रुपये झाले आहे. मात्र, मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाच्या अर्धा किलोच्या पाकिटाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
दुधाच्या किमती (Mother Dairy hikes) वाढल्याने कंपनीने दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून नवीन किमती लागू होतील, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.कंपनीने दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांसाठी दुधाच्या या किमती वाढवल्या आहेत.
दरम्यान याआधी ऑक्टोबर महिन्यातही मदर डेअरीने (Mother Dairy hikes) फुल क्रीम (full-cream) दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. यानंतर एक लिटर फुल क्रीम (full-cream) दुधाचा दर 63 रुपये प्रतिलिटर झाला होता. यापूर्वी ऑगस्टमध्येही अमूलने दुधाच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे सततच्या या दरवाढीने ग्राहकांना मोठा धक्का बसत आहे.