अमूलशिवाय इतर ब्रॅण्डचं दूध वापरताय तर तुम्हालाही हा धक्का

आता दूध आणायला जर जात असाल तर तुम्ही जरा जास्तीच पैसे हातात ठेवा.

Updated: Mar 5, 2022, 06:22 PM IST
अमूलशिवाय इतर ब्रॅण्डचं दूध वापरताय तर तुम्हालाही हा धक्का title=

नवी दिल्ली : आता दूध आणायला जर जात असाल तर तुम्ही जरा जास्तीच पैसे हातात ठेवा. याचं कारण म्हणजे आता हळूहळू सगळ्याच दुधाच्या ब्रॅण्डचे दुधाचे दर वाढत आहेत. 

अमूल पाठोपाठ आता आणखी काही ब्रॅण्डने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अर्धा लीटर दुधासाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मदर डेअरीने आपल्या दुधावर 2 रुपयांची वाढ केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार याची सुरुवात राजधानी दिल्लीपासून होणार आहे. 6 मार्चपासून मदर डेअरीचं दूध घेणाऱ्यांना 2 रुपये ज्यादा द्यावे लागणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पॅकेजिंगची किंमत आणि सामान महाग झालं आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढवण्यात येत आहेत. 

मदर डेअरीच्या सर्व प्रकारच्या दुधासाठी 2 रुपयांची वाढ लागू करण्यात येणार, अशी माहिती कंपनीच्या वतीनं देण्यात आली. याआधी अमूल दुधावर ही दरवाढ करण्यात आली होती. 

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आधीच मदर डेअरीनं 2 रुपयांनी दरवाढ केली आहे. आता राजधानी दिल्लीनंतर महाराष्ट्रातही दरवाढ लागू करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. उत्तर भारतात दर वाढल्यानंतर आता महाराष्ट्रातही दर वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये रोज 30 लाख लीटर मदर डेअरीच्या दुधाची विक्री होते. त्यामुळे नागरिकांना आणि गृहिणींना त्याचा मोठा फटका बसणार आहे.