..म्हणून आईने राष्ट्रपतींकडे मुलाला इच्छामरण देण्याची मागणी केली

 कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. या आजारांचे उपचारदेखील त्रासदायक असतात.

Updated: Sep 15, 2017, 02:23 PM IST
..म्हणून आईने राष्ट्रपतींकडे मुलाला इच्छामरण देण्याची मागणी केली  title=

कानपूर  :  कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. या आजारांचे उपचारदेखील त्रासदायक असतात.

केमोथेरपी,रेडिएशन आणि इतर उपचार जसे त्रास देतात. तसेच ते महागडे असल्याने आर्थिकदृष्ट्याही भार ठरतात. 

कॅन्सरशी झुंजणार्‍या मुलाचा त्रास बघवत नसल्याने एका आईने या आजारातून मुक्तता करून देण्यासाठी काळजावर दगड ठेवून अखेर इच्छामरण देण्याची मागणी केली आहे. कानपूरमध्ये राहणार्‍या १० वर्षाच्या मुलाचा कॅन्सरच्या विरोधात लढा सुरू आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारांचा खर्च परवडत नसल्याने अखेर या आईने हार मानली आहे.

कॅन्सरच्या उपचारादरम्यानचा त्रास आणि आर्थिक चणचण असल्याने माझ्या मुलाला मुक्त करण्यासाठी इच्छामरणाचा पर्याय द्यावा अशी मागणी या आईने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे एका पत्राद्वारा केली आहे. 
भारतामध्ये इच्छामरण हे बेकायदेशीर आहे. काही अगदीच दुर्मिळ प्रकरणांमध्ये इच्छा मरणाला परवानगी दिली जाते.