'मदर्स डे'च्या निमित्ताने सरकार या महिलांच्या खात्यात जमा करणार ५ हजार रुपये

प्रधानमंत्री मातृत्व योजनेनुसार पहिल्यांदा गर्भवती असलेल्या महिलांना सरकारकडून प्रत्येकी ५ हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. 

Updated: May 9, 2021, 09:46 PM IST
'मदर्स डे'च्या निमित्ताने सरकार या महिलांच्या खात्यात जमा करणार ५ हजार रुपये title=

मुंबई : 'मदर्स डे' च्या खास दिवसाच्या निमित्ताने केंद्र सरकारने महिलांसाठी एक खास योजना आणली आहे. ज्याचे नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असे आहे. ही योजना गर्भवती महिलांच्या विकासासाठी आहे आणि त्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा होणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यात दिली जाणार आहे. मात्र, यासाठी अंगणवाडी केंद्र (AWC) या सरकारी आरोग्य केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री मातृत्व योजनेनुसार पहिल्यांदा गर्भवती असलेल्या महिलांना सरकारकडून प्रत्येकी ५ हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे महिला आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ शकतील. पहिला टप्प्याचील रक्कम म्हणजेच 1 हजार रुपये गर्भधारणेच्या 150 दिवसांच्याआत मिळणार आहे. त्यानंतर दुस-या टप्प्यात 2 हजार रुपये 180 दिवसांच्या आत प्रसुतीपूर्व खात्यात जमा होतील. त्याचबरोबर बाकीचे2 हजार रुपये प्रसुतीनंतर बाळाची पहिली लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला www.Pmmvy-cas.nic.in या वेबसाईटवर लॉगिन करुन आवश्यक माहिती भरावी लागेल. यासाठी आधार कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे पासबुक, सरकारी दवाखान्यातून दिले जाणारे आरोग्य प्रमाणपत्र, सरकारी विभाग/ कंपनी/ संस्थाचे ओळखपत्र इत्यादींची फोटोकॉपी असणे आवश्यक आहे.

या योजनेची पात्रता

1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय १९ वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
2. सरकारी कार्यालयात नोकरी करणारी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
3. याशिवाय एखादी गर्भवती महिला सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करत असताना मॅटरनिटी लीव्हवर असेल तर ती अर्ज करु शकत नाही.