Crime News: प्रत्येक आई-बापाला (Parents) आपलं मुल आपल्या जीवापेक्षाही प्रिय असतं. आपल्या मुलाने भरपूर शिकावं, मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा असते. मुलाला थोडसं जरी लागलं तरी आईच्या डोळ्यात पाणी येतं. वडीलांचा जीव वरखाली होतो. त्यातच एकुलता एक मुलगा असेल तर त्याला कुठे आणि कुठे नको, असं आई-वडिलांना वाटत असतं. पण तोच मुलगा जर आई-बापाला नकोसा झाला तर. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने पालक आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासला आहे.
काय आहे नेमकी घटना?
जन्मत:च मुलाला शारीरिक व्यंग (Physical Sarcasm) असल्याने एका आई-वडिलांनी आपल्या तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली. मध्यप्रदेशमधल्या इंदूरमध्ये (MP Indore) ही दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी कोर्टाने त्या दोघांनाही जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली. तीन महिन्यांच्या मुलीची हत्या करुन त्या निर्दयी आई-वडिलांनी त्या चिमुरड्याचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला.
विशेष कोर्टाने या प्रकरणी 50 वर्षीय पप्पू रावल आणि त्यांची पत्नी 45 वर्षांच्या संगीता रावल यांना 302 कलमातंर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या निर्दयी आई-वडिलांनी स्वयंपाकघरातील अवजड वस्तूने मुलीची हत्या केली. हत्या केल्यानतंर त्या चिमुकलीचा मृतेदह त्यांनी गोधडी गुंडाळला आणि कचराकुंडीत फेकून दिला. कचरा वेचणाऱ्यांना मुलीचा मृतदेह दिसल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली.
मृतदेह ओळखण्यास पालकांचा नकार
पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तपास सुरु केला. तपासात रावल कुटुंबियांची मुलगी काही दिवसांपासून गायब असल्याची माहिती शेजारच्यांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रावल पती-पत्नीला ताब्यात घेतलं. पण या दोघांनीही मुलीला ओळखण्यास नकार दिला. पण डिएनए रिपोर्टमध्ये रावल पती-पत्नीच त्या मुलीचे पालक असल्याचं सिद्ध झालं.
मुलीच्या हत्येचं कारण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीला जन्मत:च व्यंग होतं. त्या मुलीला एक कान नव्हता आणि आई-वडिल ती गोष्ट मनाने स्विकार करु शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी मुलीला संपवण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी पोलिसांनी त्या निर्दयी आई-वडिलांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मुलगी आजही नकोशी?
मुलगी नको हा नारा आजही आपल्या समाजात कायम आहे. काही ठिकाणी तो थेट असतो तर काही काही ठिकाणी छुपा असतो. एकवीसव्या शतकात लोकं कितीही शिकली, प्रगत झाली तरी मुलगा-मुलगी हा भेद कायमच आहे. शहर असो वा गाव, श्रीमंत असो वा गरीब किंवा शिकलेला असो वा अशिक्षित मुलगी नको ही मानसिकता सर्वांमध्येच दिसते. मुलगा होईपर्यंत मुलींना जन्माला घालून त्यांना नकुशा असल्याची जाणीव करुन दिली जाते. त्यातचही मुलीला व्यंग असले तर त्या उमलण्याआधीच कळी कोमेजून टाकली जाते.
गेल्या काही काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. चौथी मुलगी झाली म्हणून सासरच्यांनी सूनेला रुग्णालयातून थेट अनाथालयाचा रस्ता दाखवला. बंगळुरमध्ये एका प्रियकराने प्रियसी गर्भपात करण्यास नकार देत असल्याने तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याता त्या मुलीचा गर्भपात झाला. एका भोंदबाबाने त्याला प्रियसीच्या पोटात वाढणारं बाळ मुलगी असल्याचं सांगितलं होतं. तसंच मुलीचा जन्म झाल्यास दुर्देव सुरु होईल असं सांगितलं होतं.