भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपोषणास्त्र काढलं आहे, शिवराज सिंह चौहान हे शुक्रवारपासून उपोषणावर आहेत, दरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी उपोषण सुरू केल्यानंतर मध्य प्रदेशात हिंसक घटना थांबल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेशात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ शेतकरी ठार झाले होते, यानंतर अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होता, मध्य प्रदेशात शांतता नांदावी यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपोषण सुरू केलं आहे.
शेतीमाला भाव आणि कर्जमाफीच्या देण्याच्या मुद्यावर मध्य प्रदेशात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते, यात आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.