Nafed Pulses Price: डाळी हा आपल्या जेवणाच्या ताटातील महत्वाचा भाग आहे.डाळी हा थेट सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न असल्याने सरकारने नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे. सरकारी एजन्सी नाफेडने पहिल्यांदा सरकारी सब्सिडीच्या डाळींबद्दल महत्वाची घोषणा केली आहे. यानुसार आता सरकारी सबसिडीवाले धान्य आता खासगी रिटोल आणि बिग बास्केट प्लॅटफॉर्मवर मिळू शकणार आहे. भारत डाळ ब्रॅंड अंतर्गत नागरिकांना सबसिडीची डाळ विकत घेता येणार आहे. यामुळे तुम्हाला आता कमी किंमतीत डाळी मिळू शकणार आहेत. हे कसं शक्य आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
'भारत चणा डाळ; ही खासगी रिटेलरकडून विकल्या जाणाऱ्या सर्वात कमी किंमतीच्या डाळीपेक्षाही 40 टक्के आणखी स्वस्त आहे. लवकरच खासगी रिटेलरच्या माध्यमातून भारत पीठाची विक्रीदेखील सुरु केली जाणार आहे. देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी रिलायन्स रिटेल भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांची कंपनी आहे. असे असले तरी बिग बास्केटचा मालकी हक्क टाटा डिजिटलकडे आहे.
रिलायन्सने ऑक्टोबरच्या अखेरिस भारतात डाळ विक्री सुरु केली. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रिलायन्सच्या काही स्टोअर्सवर भारत डाळीची विक्री होईल. जिथे चणा डाळीची एकूण विक्री साधारण 50 टक्के आहे, तिथे ही विक्री होईल असे सुत्रांनी सांगितले. सबसिडीवाल्या चणा डाळीमुळे स्टोअरवर असलेली खासगी डाळ विकली जात नाहीय, अशी माहिती सुत्रांनी दिली. पण सरकारी दबाव असल्यामुळे खासगी रिटेलर्सनी भारतात डाळ विकण्यास सहमती दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतात चणा डाळची विक्री उत्तर आणि पश्चिम भारतात जास्त होत आहे. येथे नाफेड भारत डाळची प्रक्रिया सुरु आहे. इकोनॉमिक टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे. भारत डाळ आणि खासगी लेबल डाळीच्या गुणवत्ते जास्त अंतर नाही. कारण दोघांनाही नाफेडमधूनच चणे मिळतात. नाफेड भारतातील एकमेव एजन्सी आहे जिच्याकडे चण्याचा स्टॉक आहे.