दुबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठी (Anant Ambani) दुबईत झाडासारखे बनवलेले पाम जुमेराह (Palm Jumeirah) या कृत्रिम बेटावर $80 दशलक्ष रुपयांची जागा विकत घेतली होती. त्यांनी या ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर आता या जागेचा भाव वाढला आहे. दुबईच्या प्रॉपर्टी (Dubai Property) मार्केटमधील हा सर्वात महागडा सौदा ठरला. जागतिक पोलाद कंपनी आर्सेलर मित्तलच्या लक्ष्मी मित्तल यांनीही दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे.
मुकेश अंबानी यांनी पाम जुमेरामध्ये (Mukesh Ambani bought home in Dubai) मालमत्ता खरेदी केल्यानंतर जगातील श्रीमंतांमध्ये या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्याची स्पर्धा लागलीये. $82.2 दशलक्ष म्हणजे सुमारे 700 कोटी रुपयांची मालमत्ता काही दिवसांपूर्वी एकाचे खरेदी केली आहे. पण या महिन्यात दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये सर्वात महागडी डील झाली आहे. दुबईच्या भूमी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाम जुमेराहमध्ये 1,300 कोटी रुपयांची प्रॉपर्टी डील झाली आहे. पण ती कोणी विकत घेतली हे अजून समोर आलेलं नाही.
रशिया-युक्रेन युद्ध (Russia - Ukraine War) सुरू झाल्यानंतर अनेक श्रीमंत रशियन उद्योगपतींनी दुबईच्या पाम जुमेराहमध्ये मालमत्ता खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडच्या काळात त्या ठिकाणी जागेची मागणी वाढत आहे.
दुबईच्या रिअल इस्टेट (Dubai Real Estate) मार्केटमध्ये तेजी दिसत आहे. येथे 70 टक्के व्यवहार रोखीने केले जातात, त्यामुळे सौदा लवकर पूर्ण होतो. गेल्या वर्षभरात येथील रिअल इस्टेटच्या किमती 70 टक्क्यांहून अधिकने वाढल्या आहेत. जगातील सर्वात जास्त मागणी असलेल्या आणि महागड्या मालमत्ता पैकी एक आता ही जागा ठरली आहे.
दुबईतील मालमत्तेची नोंदणी सार्वजनिक केली जात नाही आणि जमीन विभाग मालमत्ता खरेदीदारांची ओळख उघड करत नाही. त्यामुळे गृह खरेदीत ही मोठी तेजी जिसत आहे. क्रिप्टो गुंतवणूकदारांबाबत इस्त्रायली गुंतवणूकदार हेज फंड एक्झिक्युटिव्हचे हे आवडते ठिकाण आहे. दुबईमध्ये क्राईस रेट खूपच कमी आहे. दुबईमध्ये मालमत्ता खरेदीवर कर देखील कमी आहे. यूकेमध्ये 15 टक्क्यांच्या तुलनेत येथे फक्त 4 टक्के कर आकारला जातो.