नीना कोठारी यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या कोठारी शुगर्स ऍण्ड केमिकल्स लिमिटेडच्या चेअरपर्सन आहेत. नीना या आज कोटींची संपत्ती सांभाळत आहे. महत्त्वाचं म्हणजे नीना कोठारी यांची कंपनी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर व्यवहार करत आहे. मुकेश आणि अनिल अंबानी यांची ही बहिण असून त्या मीडियापासून तसेच लाइमलाइटपासून दूर राहतात. अनेकांना माहितच नाही की, नीना कोठारी या अंबानी कुटुंबातील एक आहेत.
नीना कोठारी या धीरुभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांची लेक आहे. 2003 मध्ये त्यांनी आपला व्यावसायिक प्रवास सुरु केलाय. नीना यांनी 2003 मध्ये जावाग्रीन कॉफी अँड फूड फ्रेंचायसी सुरु केली.
1986 साली नीना कोठारी यांनी व्यवसायिक भद्रश्याम कोठारी यांच्यासोबत लग्न केलं. भद्रश्याम कोठारी यांचं 2015 साली कॅन्सरमुळे निधन झालं. या दोघांना नयनतारा आणि अर्जुन कोठारी अशी दोन मुलं आहे. 8 एप्रिल 2015 रोजी नीना यांची चेअरपर्सन पदावर नियुक्ती झाली. आतापर्यंत त्यांनी कार्पोरेट जगतातील अनेक समस्यांना तोंड दिलं आहे. एवढंच नव्हे पतीच्या निधनानंतर व्यवसाय सर्वोच्च पदावर नेलं आहे.
पद स्वीकारल्यानंतर नीना यांनी एचसी कोठारी ग्रुप आणि उद्योगाचा विस्तार केला. कोठारी पेट्रोकेमिकल्स आणि कोठारी सेफ डिपॉझिट्स कोठारी ग्रुपच्या दोन इतर कंपन्या आहेत. कार्पोरेट शेअर होल्डिंगनुसार, त्यांची एकूण संपत्ती 52.4 कोटी रुपयांहून अधिक आहे. तर कंपनीचा मार्केट कॅप 3.33 अरब कोटी रुपये इतका आहे.
नीना कोठारी या अंबानी कुटुंबापेक्षा नक्कीच वेगळ्या आहेत. त्या कायमच लाइमलाइटपासून दूर राहतात. एवढंच नव्हे तर जेव्हा कधी नीना कोठारी अंबानी कुटुंबांच्या कार्यक्रमात किंवा इतर कार्यक्रमात सहभागी होतात पण त्या कॅमेऱ्यापासून कायमच दूर राहतात.
नीना कोठारी या दोन्ही भावांच्या अगदी जवळ आहेत. जेव्हा त्यांचा मुलगा अर्जुनचं लग्न होतं तेव्हा दोन्ही भावडांनी आपापल्या घरात उत्सव साजरा केला. एवढंच नव्हे तर नीना यांची मुलगी नयनताराच्या प्री-वेडिंगला अँटिलियामध्ये प्री वेडिंग पार्टी आयोजित केली होती.