VIDEO: अपर्णा यादवच्या ‘घुमर’ डान्सवर करणी सेना नाराज

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची सुन अपर्णा बिष्ट यादवचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 30, 2017, 08:32 AM IST
VIDEO: अपर्णा यादवच्या ‘घुमर’ डान्सवर करणी सेना नाराज title=

नवी दिल्ली : देशभरात संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’मुळे वादळ उठलं आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची सुन अपर्णा बिष्ट यादवचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत ती ‘पद्मावती’ सिनेमातील घुमर गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ तिच्या भावाच्या साखरपुड्यातील असल्याचे बोलले जात आहे. आता या गाण्यावर डान्स केला म्हणून करणी सेनेने तिच्या टीका केली आहे. अपर्णा स्वत: राजपूत आहे पण ती आपल्याच समाजाचा सन्मान करत नाहीये, अशी टीका करणी सेनेने केली आहे. 

करणी सेनेचे मुख्य लोकेंद्र सिंह म्हणाले की, ‘आम्ही आमच्या समाजाच्या सन्मानासाठी संघर्ष करत आहोत. राजपूत असूनही भावनांचा विचार न करता तिने या गाण्यावर डान्स केला. जर त्याना याप्रकारच्या राजस्थानी गाण्यावर डान्स करायचा असेल तर आम्ही ओरिजिनल घुमर आणि राजस्थानी गाणी पाठवून देऊ’.

अपर्णा बिष्ट ही सुद्धा त्याच राजपूत समाजातील आहे ज्या समाजाकडून ‘पद्मावती’ सिनेमाला कडाडून विरोध केला जात आहे. अपर्णा ही मुलायम सिंह यादव यांचा लहान मुलगा प्रतिकची पत्नी आहे.