मुंबई: टेक्सटाईल कंपनीच्या या शेअर्समध्ये अलीकडेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 5% वाढ झाली. त्याचबरोबर मागील वर्षभरात या शेअरवरील रिटर्न्सदेखील चांगले आहेत. यापुढे देखील या शेअरमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही त्याबद्दल तज्ञांचे मत काय आहे?
वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख ट्रायडेंट लिमिटेडचे शेअर्स BSEवर गुरूवारी 5% नी वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. कंपनीचा शेअर 45.20 रुपयांपर्यंत पोहोचला. मागील तीन दिवसांवर नजर टाकली तर कंपनीच्या शेअरमध्ये 16% वाढ नोंदवली आहे.(Trident Limited)
एका वर्षात ट्रायडेंट लिमिटेडच्या स्टॉकने सुमारे 500% परतावा दिला. वर्षभरापूर्वी कंपनीचा शेअर फक्त 7.56 रुपयांवर होता तो आता 45.20 रुपये इतका झाला आहे. जानेवारी 2021 ते आत्तापर्यंत पाहिले तर स्टॉकची वाढ 357% झाली आहे.
जर एखाद्या व्यक्तीने ट्रायडेंट लिमिटेडच्या शेअर्समध्ये वर्षभरापूर्वी 5 लाख रुपये गुंतवले असतील, तर सध्याच्या शेअरच्या किंमतीनुसार त्याला 30 लाख रुपयांचा परतावा मिळेल. एवढेच नाही तर कंपनीचे बाजार भांडवलही सध्याच्या किंमतीनुसार 23 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा ताळेबंद पाहणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण ट्रायडेंट लिमिटेडच्या निकालांवर नजर टाकली तर, जुलै-सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 234.59 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 105.69 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांची ट्रायडंट लिमिटेडच्या शेअर्सबाबतची भूमिका खूपच आहे. मोतीलाल ओसवाल म्हणतात की कोविड-19 लॉकडाऊन हटवल्यानंतर ट्रायडंटच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.
होम फर्निशिंग टेक्सटाइल्समध्ये ही मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे आणि कार्यालये आणि शाळा सुरू झाल्यामुळे कंपनीचा पेपर व्यवसायही वाढण्याची अपेक्षा आहे.