Multibagger Stock: खूशखबर! हा स्टॉक 12 वरून थेट पोहोचला 300 रूपयांवर, गुंतवणुकदारांची झाली चांदी

Multibagger Stock: या स्टॉकमध्ये जर का तुम्ही 23 वर्षांपुर्वी गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला फार चांगला फायदा मिळू शकतो. त्यावेळी हा शेअर तब्बल 12.50 रूपयांना विकला गेला होता. 

Updated: Feb 9, 2023, 06:04 PM IST
Multibagger Stock: खूशखबर! हा स्टॉक 12 वरून थेट पोहोचला 300 रूपयांवर, गुंतवणुकदारांची झाली चांदी

Multibagger Stock: आपल्याला कायमच गुंतवणूकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधायचे असतात. त्यामुळे आपण शेअर मार्केटच्या आकड्यांकडे लक्ष देतो. आज शेअर मार्केटमध्ये अनेक शेअर हे लिस्टेड आहेत. त्यातून असे काही शेअर आहेत जे गुंतवणूकदारांसाठी (Investment) फायदेशीर ठरू शकतात. तर काही शेअर हे असेही आहेत ज्यांना गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्ममध्येही खुप मोठा फायदा दिला आहे. सध्या अशाच काही शेअर्सची चलती आहे. त्यापैंकी एक शेअर असा आहे की जो तुम्हाला कमी कालावधीत मोठा आणि लॉन्ग टर्न (Long Term) फायदा देऊ शकतो.  सध्या आम्ही तुम्हाला ज्या शेअरबद्दल सांगणार आहोत ज्यानं गुंतवणूकदारांना मोठा फायदा दिला आहे. या शेअरनं गुंतणूकदारांना 23 वर्षांमध्ये खूप चांगला फायदा देण्यात आला आहे. (Multibagger Stock these stock will give you unexpected returns read the full article)

गुंतवणूकदारांना काय ठेवावे लक्षात? 

या स्टॉकमध्ये जर का तुम्ही 23 वर्षांपुर्वी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला फार चांगला फायदा मिळू शकतो. त्यावेळी हा शेअर तब्बल 12.50 रूपयांना विकला गेला होता. तर तेव्हा ज्या गुंतवणूकदारानं हा शेअर विकत घेतला असेल त्याला 1 लाख रूपयांच्या बदल्यात 8000 शेअरचा भाव (Share Price) मिळाला असता. 

काय आहे या शेअरची किंमत?

9 फेब्रुवारीला या कंपनीचे क्लोझिंग हे 333.75 इतके झाले आहे. हा शेयर थोड्याफार प्रमाणात ट्रेडिंग (Trending) करतो आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनाही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या शेअरची किंमत जर 8000 ज्या हिशोबानं जर विचार केला तर 333.75 रूपयांच्या मानानं हा शेअर 26.64 लाख रूपयांना मिळाला असता.

जाणून घ्या या शेअरबद्दल

आम्ही ज्या शेअरबद्दल बोलतो आहोत त्याचे नावं आहे बीपीसीएल (BPCL). ज्यानं गुंतवणूकदारांना खूप मोठा फायदा करून दिला आहे. या शेअरनं गुंतवणूकदारांना 13 जून 2000 ला क्लोझिंग अमांऊट 12.50 रूपये एवढी होती. या नंतर या शेअरची किंमत वाढतच गेली. त्यातून तब्बल 17 वर्षांनी मात्र या शेअरनं म्हणजे 2017 मध्ये 500 च्या वर ही किंमत पोहचवली होती. त्यामुळे 12-13 रूपयांपासून सुरू झालेला हा शेअर आता 500 च्या घरात पोहचला आहे.