19 रुपयांचा शेअर पोहचला थेट 600 रुपयांवर; 1 लाखांचे झाले तब्बल 32 लाख, तुम्ही गुंतवणूक केली का?

multibagger stocks/high return stocks : पेनी स्टॉकमध्ये मोठी जोखीम असते, परंतू तेवढाच मोठा परतावा मिळवण्याची क्षमता देखील..! त्यामुळे चांगले फंडामेंटल असलेल्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांची नजर असते. असाच एक शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.

Updated: Jan 6, 2022, 09:27 AM IST
19 रुपयांचा शेअर पोहचला थेट 600 रुपयांवर; 1 लाखांचे झाले तब्बल 32 लाख, तुम्ही गुंतवणूक केली का? title=

मुंबई : पेनी स्टॉकमध्ये मोठी जोखीम असते, परंतू तेवढाच मोठा परतावा मिळवण्याची क्षमता देखील..! त्यामुळे चांगले फंडामेंटल असलेल्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांची नजर असते. असाच एक शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. तो शेअर म्हणजे आदित्य व्हिजन होय..

अदित्य व्हिजनने अवघ्या 2 वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आदित्य व्हिजनच्या शेअरने 2 वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे 3200 टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, सध्या त्याची किंमत किती आहे. याबद्दल जाणून घेऊया...

एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर, त्याची किंमत  आज 16.60 लाख रुपये झाली असती. अदित्य व्हिजनचा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.

परंतू गेल्या काही महिन्यांपासून आदित्य व्हिजनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. जुलै 2021 मध्ये कंपनीचे शेअर्स 1,564.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स सुमारे 18 टक्क्यांनी घसरले आहेत.