मुंबई : सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यातच महागाईत वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल या इंधन तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच खाद्यतेलाच्या किमतीतही कोरोना काळात दरवाढ करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या सिलिंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. देशात महागाईचा भडका उडताना दिसत आहे. असे असताना देशाची आर्थिक राजधानी सर्वात महागडी असल्याचे पुढे आले आहे. (Mumbai most expensive city in India)
मर्सर कॉस्ट ऑफ लिव्हिंगने जगातील सर्वात महागड्या 209 शहरांची यादी जारी केली आहे. यात मुंबई कामगारांसाठी देशातील सर्वात महागडे शहर आहे. तर जगात मुंबईचा 78 वा क्रमांक लागतो. दिल्लीचा 117 वा तर चेन्नईचा 158 वा तर कोलकाता 181व्या स्थानी आहे. भारतीय रुपयाचे अवमूल्य हे यामागचे कारण सांगितले गेले आहे. दरम्यान जगातील सर्वात महागड्या शहरांमध्ये तुर्कमेनिस्तानातील अश्गाबाद या शहराचा अव्वल क्रमांक आहे. आर्थिक मंदी हे यामागचे मुख्य कारण आहे. विशेष म्हणजे टॉप 10 शहरांमध्ये अमेरिकेतील एकाही शहराचा समावेश नाही.
मर्सरच्या संशोधनानुसार, सर्वात जास्त दहा महागड्या शहरांमध्ये सर्वाधिक जागतिक आर्थिक केंद्र असलेल्या शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेला हाँगकाँग यावर्षी दुसर्या क्रमांकावर आला आहे. याशिवाय लेबनॉनची राजधानी बेरूत आर्थिक पेचप्रसंगामुळे तिसर्या स्थानावर आली आहे. त्याचवेळी, अन्य प्रमुख शहरांमध्ये केवळ आर्थिक केंद्र असलेली शहरे प्रमुख आहेत. चौथ्या क्रमांकावरील जपानची राजधानी टोकियो हे सर्वात महागडे शहर आहे. तर स्वित्झर्लंडमधील झुरिख शहराला या क्रमवारीत पाचवे स्थान मिळाले आहे.
त्याचबरोबर चीनमधील शांघाय शहर हे जगातील सहावे सर्वात महागडे शहर मानले जाते. शांघाय शहरातही लोकांचे जगणे आणि दररोजच्या वस्तू खूप महाग असतात. मर्सरच्या अहवालानुसार सिंगापूर हे जगातील सातवे सर्वात महागडे शहर आहे, तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहर हे जगातील आठवे महागड्या शहर आहे. त्याचबरोबर चीनची राजधानी बीजिंग जगातील पहिल्या दहा महागड्या शहरांपैकी नवव्या स्थानावर आहे, तर स्टे बर्न शहर जगातील दहावे महागडे शहर बनले आहे.
मर्सरच्या सर्वेक्षणानुसार यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात युरोच्या तुलनेत डॉलरचे मूल्य 11 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याचा थेट परिणाम महागाईच्या गणनेवर झाला आहे आणि यामुळे अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर टॉप-10 मध्ये जरी असले तरी ते महागडे नाही. या सर्वेक्षणात अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर 18व्या स्थानावर आहे, तर लॉस एंजलिस 25 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, फ्रान्सचे पॅरिस शहर महागाईच्या या यादीमध्ये आपले स्थान निर्माण करू शकले नाही. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन डॉलरचे बाजार मूल्य देखील खाली आले आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियामधील सिडनी सारख्या महागड्या शहरांचा 10-10 मध्ये समावेश होऊ शकला नाही.
1-अश्गाबात
2-हाँगकाँग
3-बेरूत
4-टोकियो
5-ज्यूरिख
6-शांघाय
7-सिंगापूर
8- जिनिव्हा
9-बीजिंग
10 बर्न