चाप बसणार, सोशल मीडियावरील फेक अकाऊंट होणार बंद!

सध्या समाज माध्यमांचा (social media) बोलबाला आहे. एखादी बाब समाज माध्यमांवर पोस्ट केली तर लगेच व्हायरल होते. मात्र... 

Updated: Jun 24, 2021, 07:01 PM IST
चाप बसणार, सोशल मीडियावरील फेक अकाऊंट होणार बंद! title=

मुंबई : सध्या समाज माध्यमांचा (social media) बोलबाला आहे. एखादी बाब समाज माध्यमांवर पोस्ट केली तर लगेच व्हायरल होते. मात्र, चांगली गोष्ट असेल तर ठिक. मात्र, बदनामी करणारी पोस्ट किंवा एखाद्याला टार्गेट करण्यासाठी फेक अकाऊंटची मदत घेतली जाते. त्यामुळे एखाद्याची नाहक बदनामी होते. याला आता चाप बसणार आहे. कारण सोशल मीडियावरील (social media) फेक अकाऊंट (fake accounts) बंद होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठे पाऊल उचलले आहे. (Indian Government orders Facebook, Twitter, Google to remove fake accounts within 24 hours of complaint)

सोशल मीडियावरील फेक अकाऊंट बंद करण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सोशल मीडियासाठी केंद्र सरकारने नवी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार तक्रार आल्यास 24 तासांत फेक अकाऊंट बंद करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे आता फेक अकाऊंटन्सना चाप बसणार  आहे.

सध्या फेसबुक ( Facebook) , इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटवरवर ( Twitter) फेक अकाऊंटचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपल्या अकाऊंटवर सेलिब्रिटी, राजकीय नेते तसेच बड्या व्यक्तींच्या फोटोचा वापर करू लागले आहेत. यासंदर्भात संबंधित व्यक्तीने सोशल मीडियाकडे तक्रार केल्यास 24 तासांत असे फेक अकाऊंट्स बंद करणे बंधनकारक असणार आहे. अशा फेकअकाऊंटवर कारवाई करण्यासंदर्भात केंद्राने नवी नियमावली तयार केली आहे. त्यामुळे फेक अकाऊंट बनवणाऱ्यांना लगाम लागणार आहे.