...म्हणून आईने पोटच्या मुलीलाच संपवलं, कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल

   माय लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Updated: Aug 9, 2022, 05:23 PM IST
...म्हणून आईने पोटच्या मुलीलाच संपवलं, कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल title=

Crime News : आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जिच्याजवळ सर्व गुन्हे माफ होतात ती म्हणजे आई. आपल्या मुलांसाठी आई कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्याची ताकद ठेवते. मात्र उत्तर प्रदेशमधील एका थरारक घटनेने माय लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नफीसा असं महिलेचं नाव आहे. (Latest Marathi Crime News)

आईने का उचललं टोकाचं पाऊल

नफीसा ही आपल्या तीन मुलांसह राहत होती. तिच्या पतीचं वर्षभरापूर्वी निधन झालं होतं. छोटी-मोठी काम करून ती आपल्या संसाराचा गाडा हाकत होती. मात्र वडिलांचं छत्र नसल्यामुळे मुलगी नशेच्या आहारी गेली. नफीसाच्या कानावर याबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या. मुलगी नशा करत असल्याचं अनेकवेळा तिला सांगण्यात आलं. या गोष्टीला नफीसा वैतागून गेली होती.

नफीसाने अशी केली मुलीची हत्या

दोन मुलांना म्हणजेच मुलगा असद आणि मुलगी नसरीन यांना बाहेर बाजारात पाठवलं. त्यानंतर तिने 19 वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. इतकंच नाहीतर पोलिसांना फोन लावत हत्येबाबत माहिती दिली आणि बॉडी घेऊन जायला सांगितली.

हत्या करून नफीसा फरार झाली. नंतर तिचा मोबाईलही बंद होता. पोलिसांनी मृत मुलीची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवली आहे. फरार नफीसाचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, पोटच्या मुलीची हत्या केल्यामुळे गाजियाबादच्या लाजपत नगरमध्ये खळबळ उडाली आहे.