झी न्यूजचे अ‍ॅंकर रोहित सरदाना यांना धमकी

लोकप्रिय ‘झी न्यूज’ चे अ‍ॅंकर रोहित सरदाना यांना एका मुस्लीम व्यक्तीने ट्विटरवरून धमकी दिली आहे.

Updated: Aug 11, 2017, 07:05 PM IST
झी न्यूजचे अ‍ॅंकर रोहित सरदाना यांना धमकी title=

नवी दिल्ली : लोकप्रिय ‘झी न्यूज’ चे अ‍ॅंकर रोहित सरदाना यांना एका मुस्लीम व्यक्तीने ट्विटरवरून धमकी दिली आहे.

रोहित सरदाना यांनी झी न्यूजवर येत असलेल्या लोकप्रिय ‘ताल ठोक के’ या डिबेट शोची माहिती देत म्हटले होते की, हमिद अन्सारी हे रिटायर झाल्या झाल्या ‘मुसलमान’ झाले ? त्यांचं हे ट्विट बिलाल लंबरदार नावाच्या मुस्लिम व्यक्तीला अजिबात आवडले नाही आणि त्याने धमकी देत ट्विट केले की, ‘२०१९ मध्ये तुझी नाल ठोकली जाईल, तोपर्यंत विष पसरवत रहा’.

रोहित सरदना यांनी त्या व्यक्तीच्या ट्विटला रिट्विट करत लिहिले की, ‘हे घ्या, अन्सारी साहेबांना हे दाखवा कुणीतरी. इथे तारखांसहीत धमक्या देत आहेत काही लोक आणि अन्सारी म्हणताहेत की मुसलमान घाबरत आहेत’.

त्यानंतर रोहित सरदाना यांनी गंमतीत आणखी एक ट्विट केलं, ‘विषाचे फारच एक्सपर्ट वाटताय, विकताय का तुम्ही? आणि हा २०१९ चा मुहुर्त कुठून काढून आणलाय ?’ 

नंतर बिलालच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट हटवण्यात आलं.

दरम्याम, उपराष्ट्रपती म्हणून हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ गुरूवारी संपला. त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी त्यांनी मोठं वक्तव्य करत म्हणाले की, ‘देशातील मुस्लिम समुदायात आज असुरक्षा आणि भीतीदायक वातावरण आहे’.

त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय क्षेत्रात चांगलंच वादळ उठलं आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या या वक्तव्यावर चांगलीच चर्चा होत आहे. काही यूजर्स म्हणाले की, ‘दहा वर्ष ते उपराष्ट्रपती पदावर होते, तेव्हा त्यांना मुसलमान सुरक्षित दिसत होते. मात्र आता पदावरून पायउतार झाल्यावर त्यांना मुसलमान असुरक्षित दिसत आहेत.