या दहा लार्जकॅप कंपन्यांवर Mutual Funds चा विश्वास कायम; लोकांनी गुंतवला बक्कळ पैसा, तुमच्याकडे आहे का?

म्युचुअल फंडचा विश्वास फ्रंटलाईन शेअर्सवर कायम आहे. जून तिमाहीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर सर्वात जास्त मार्केट कॅपच्या टॉप 10 मधील 8 कंपन्यांचे शेअर्समध्ये म्युचुअल फंडने शॉपिंग केली आहे.

Updated: Aug 21, 2021, 12:52 PM IST
या दहा लार्जकॅप कंपन्यांवर Mutual Funds चा विश्वास कायम; लोकांनी गुंतवला बक्कळ पैसा, तुमच्याकडे आहे का? title=

Mutual Funds Shopping List : म्युचुअल फंडचा विश्वास फ्रंटलाईन शेअर्सवर कायम आहे. जून तिमाहीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर सर्वात जास्त मार्केट कॅपच्या टॉप 10 मधील 8 कंपन्यांचे शेअर्समध्ये म्युचुअल फंडने शॉपिंग केली आहे. जून तिमाहीच्या दरम्यान या कंपन्यांमध्ये म्युचुअल फंडने तिमाहीच्या तुलनेत आपली भागिदारी वाढवली आहे. टॉप 10 मार्केट कॅपवाल्या कंपन्यांचा विचार केल्यास इंफोसिस आणि हिंदुस्तान युनिलिवर सोडून इतर 8 कंपन्यांमध्ये खरेदी दिसून आली आहे.  जाणून घ्या लार्जकॅप शेअर्समध्ये म्युचुअल फंडने  कशात आणि किती खरेदी केली आहे.

RIL
रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये म्युचुअल फंडच्या भागिदारीमध्ये मार्च तिमाहीत 4.43 टक्क्यांच्या तुलनेत वाढ होऊन 4.69 टक्के झाले आहे. RIL देशातील सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. यामध्ये कंपनीच्या प्रमोटर्सची भागिदारी 50.59 टक्के आहे.

TCS
टाटा कंसलटेन्सी सर्विसेसमध्ये म्युचुअल फंडची भागिदारी 2.85 टक्क्यांनी वाढून 2.96 टक्के झाली आहे. ही कंपनी मार्केट कॅपच्या बाबतीत दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. FIIची भागिदारी 15.43 टक्के आहे. तसेच DIIची भागिदारी 21.2 टक्क्यांनी वाढून 21.6 टक्के झाली आहे.

HDFC Bank
HDFC Bank मध्येदेखील म्युचुअल फंड्सने आपली भागिदारी वाढवली आहे. आता म्युचुअल फंड्सची भागिदारी 12.98 टक्क्यांनी वाढून 13.07 टक्क्यांवर पोहचली आहे. ही तिसरी सर्वात मोठी मार्केट कॅप असेलेली कंपनी आहे. 

HDFC Ltd
HDFC Ltd मध्ये म्युचुअल फंड्सची हिस्सेदारी 8.34  टक्क्यांनी वाढून 8.88 टक्के झाली आहे. 

ICICI Bank
ICICI Bank मार्केट कॅपच्या रॅकिंगमध्ये 7 वी मोठी सर्वात मोठी कंपनी आहे. यामध्ये म्युचुअल फंडमधील भागिदारी 26.07 टक्क्यांनी वाढून 26.26 टक्के झाली आहे. 

Bajaj Finance
Bajaj Finance वर म्युचुअल फंडचा विश्वास कायम आहे. आणि त्यांनी आपली भागिदारी 6.39 टक्क्यांनी वाढवून 6.57 टक्के केली आहे. 

SBI 
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयची ओळख आहे. बँकेच्या शेअर्समध्ये म्युचुअल फंड्सची भागिदारी 12.57 टक्क्यांनी वाढून 12.75 टक्के झाली आहे. 

Kotak Mahindra Bank 
कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समधील म्युचुअल फंड्सची भागिदारी 8.03 टक्क्यांनी वाढून 8.39 टक्के झाली आहे. मार्केट कॅपच्या रॅंकिंग नुसार 10 वी  सर्वात मोठी कंपनी आहे.