फोटोमधील मिठी मारणाऱ्या कपलचे पाय उलटे? यामागील कारण समोर येताच, सर्वांना बसला धक्का

सोशल मीडियावर असाच एक फोटो समोर आला आहे. जो पाहिल्यावर आपल्याला पहिल्याच नजरेत आपला गोंधळ उडेल.

Updated: Apr 6, 2022, 05:02 PM IST
फोटोमधील मिठी मारणाऱ्या कपलचे पाय उलटे? यामागील कारण समोर येताच, सर्वांना बसला धक्का title=

मुंबई : आपल्यासमोर बऱ्याचदा अशा गोष्टी समोर येतात, ज्याला एका नजरेत पाहिल्यानंतर आपल्याला ती गोष्ट काय आहे? हे कळतच नाही. बऱ्याचदा आपण मेंदूवर जोर दिला तरी देखील आपल्याला नक्की काय दिसलं हे लक्षात येत नाही. काही लोक या गोष्टीबद्दल जास्त विचार करु लगातात. तर काही लोक याकडे दुर्लक्ष करुन निघून जातात. आपल्याला बऱ्याचदा रात्रीच्या अंधारात देखील आभासी आकृती दिसतात. जे प्रकाशाच्या कमतरतेमुळे तयार होतात. परंतु आपण अशा आकृती पाहून घाबरुन जातो.

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो समोर आला आहे. जो पाहिल्यावर आपल्याला पहिल्याच नजरेत काही वेगळंच दिसतं, परंतु या रहस्यमय फोटो मागील सत्य काही वेगळंच आहे.

हा फोटो समुद्र किनाऱ्याचे आहे. ज्यामध्ये एक कपल एकमेकांना मिठी मारून रोमान्स करत आहे. या फोटोला पहिल्याच नजरेत पाहिल्यावर सगळं काही ठिक दिसतं. परंतु जेव्हा तुम्ही या दोघांच्या पायाकडे पाहाल, तेव्हा या फोटोमधील खरा गोंधळ तुमच्या लक्षात येईल.

तुम्ही अगदी डोळे चोळून जरी या फोटोकडे पाहिलात, तरी देखील तुम्हाला त्यांचे पाय उलटेच दिसतील.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला लोकांनी त्याला दोन भूतांचा फोटो म्हटले आहे, तर काहींनी याला फोटो ट्रिक म्हटले आहे. पण फोटोची खोलवर तपासणी केल्यावर लक्षात आले की, हा फोटो ना भुताचा आहे ना त्यात कुठलीही ट्रीक वापरली आहे. ना त्याला कोणी एडिट केलं आहे.

मग आता हा प्रश्न उद्भवतो की, दोघांचेही पाय उलटे का? हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे. मात्र, एका गुप्तहेरला त्याचे रहस्य कळले आहे.

द सनच्या वृत्तानुसार, एका गुप्तहेराने फोटोचे सखोल विश्लेषण केले. यानंतर महिला आणि पुरुष दोघांनीही फोटो काढण्यात कोणतीही युक्ती वापरली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यांनी जे कपडे घातले आहेत, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे.

खरतर त्या तरुणाने पांढऱ्या टी-शर्टसोबत काळी कॅप्री घातली होती आणि त्या कॅप्रीला पांढरा कपडा बांधला आहे. या महिलेनेही पांढरी पॅन्ट घातली आहे. ज्यामुळे आपल्या सर्वांना पाहाताना ऑप्टिकल इल्यूजन होत आहे.

गुप्तहेरांनी प्रकरण उघडकीस आणले
आणखी एका गुप्तचराने खुलासा केला, 'तिच्या शॉर्ट्सला दोन रंग आहेत. मध्यभागी पांढरा, बाहेरून काळा. ज्यामुळे तिच्या काळा कपड्याचा भाग पांढऱ्या पॅन्टच्या वर जातो, ज्यामुळे हा भ्रम होतो, पण फक्त तिच्या ड्रेसमुळेच आपल्याला हा सगळा प्रकार दिसते.'

तुम्हीही हा फोटो पहा आणि जाणून घ्या की गुप्तहेराचा दावा खरा आहे की या मागे आणखी काही कारण आहे.