पूरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पूरग्रस्तांनी केली 'ही' मागणी

Nagpur Flood: पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.

Updated: Sep 24, 2023, 01:10 PM IST
पूरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पूरग्रस्तांनी केली 'ही' मागणी title=

Nagpur Flood: पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी फडणवीस नागपुरात दाखल झालेयत. नागपुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांचं नुकसान झालंय.त्यामुळे आज नुकसानग्रस्त भागाची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी सुरू आहे. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी अंबाझरीमधील पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. पाहणी करुन पुढे जात असतानाच पुरग्रस्तांनी उपमुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली. काय होती ही मागणी? फडणवीसांनी यावर काय प्रतिक्रिया दिली? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

नागपुरातील डागा ले आउट भागात पुरामुळे 10 हजार घरांचं नुकसान झालं आहे. ढगफुटीसारख्या पावसानं नागपुरातील अनेक भागात पुराचं पाणी शिरलं.. शेकडो संसार उघड्यावर आलेत.. पुराच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून तातडीची मदत जाहीर करण्यात आलीये मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप पूरग्रस्तांनी केलाय.. नागपुरातील कॉर्पोरेशन कॉलनीतील अनेक घरं पाण्याखाली गेली होती.. या भागातील गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय. सर्व पुरग्रस्तांना मदत मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पूरग्रस्तांना तातडीची दहा हजारांची मदत तर दुकानांना 50 हजार आणि टपरीधारकांना दहा हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.सरकारची मदतही तुटपुंजी असल्याचा आरोप नागरिकांनी केला.याची दखल फडणवीसांनी घेतली. त्यांनी पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं आश्वासन दिलंय. 

घरातील वस्तू पाण्यावर तरंगल्या 
नागपुरात मुसळधार पावसाचा आणि अंबाझरी ओव्हर फ्लोचा सगळ्यात मोठा फटका अंबाझरी पॉईंटलगतच्या परिसराला बसलाय. अंबाझरी लेआउट इथल्या अश्विन पैगवार यांचं मोठं नुकसान या पावसात झालं आहे. संपूर्ण घरात पाणी घुसल्यामुळे घरातील सर्व वस्तू पाण्यात तरंगायला लागल्या होत्या.. आयुष्यभर पैसे जमा करुन घेतलेल्या वस्तूंची पुरामुळे वाताहत झाली आहे.