गरीब मुलींना दत्तक घेऊन थाटात लग्न लावणारी किन्नर! आतापर्यंत वसवला 15 जणींचा संसार

Trending News In Marathi: तृतीयपंथी तरी देखील मनाचा मोठेपणा दाखवून तिने मुलींना दत्तक घेतले आणि आज मोठ्या धामधुमीत त्यांचे लग्न लावून दिले.

मानसी क्षीरसागर | Updated: May 23, 2024, 04:42 PM IST
गरीब मुलींना दत्तक घेऊन थाटात लग्न लावणारी किन्नर! आतापर्यंत वसवला 15 जणींचा संसार title=
Naina Kinnar resolved to adopt daughters of poor families and got her married

Trending News In Marathi: अनेक मुलींच्या लग्नात आर्थिक मदत पुरवलेल्या नैना या तृतीयपंथीने आता गरीब कुटुंबातील मुलींना दत्तक घेऊन त्यांचे कन्यादान करण्याचा संकल्प केला आहे. याची सुरुवातच ती गुरुवारी एका मुलीचे कन्यादान करुन करणार आहे. राजस्थानातील महिला सुमन देवी लग्न व इतर कार्यक्रमांत जेवण बनवण्याचे काम करायची. गेल्या कित्येकवर्षांपासून ती माहेरी राहूनच तिचे कुटंब सांभाळते. काही वर्षांपूर्वी ती आजारी पडली तेव्हा तिची मुलगी सुमननेच तिचा सांभाळ केला. तेव्हाच नैना यांनी ठरवलं होतं की भावनाला दत्तक घेऊन तिचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न लावून द्यायचे.

नैनानेच ठरवलं लग्न

भावनासाठी नैना यांनीच पुढाकार घेत तिच्या लग्नाची तयारी सुरू केली. लग्नासाठी तिनेच मुलगादेखील शोधला होता. चुरु जिल्ह्यातील राजगढमधून लग्नाची वरात येणार आहे. लग्नातील मुलीचे दागिने, नवरदेवाचा खर्च, वऱ्हाडींचे स्वागत, खाण्या-पिण्याची व्यवस्था यासगळ्याचा खर्च नैनाच उचलणार आहेत. भावनाला दोन भाऊ आणि एक बहिण आहे. या लग्नामुळं भावनादेखील खूप आनंदी आहे. तिने कधी विचारदेखील केला नव्हता की इतक्या धुमधडाक्यात तिचे लग्न होईल. नैनाने तिच्या लग्नासाठी उचललेला खर्च पाहून भावनाला भरुन आले होते. तर, आपली मुलगी नेहमी खुश राहावी, यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

भावनाच्या लग्नानंतर आता प्रत्येक वर्षी नैना एका गरीब कुटुंबातील मुलीला दत्तक घेऊन तिचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न लावून देणार आहे. प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतं की त्यांच्या मुलीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात करावे. मात्र, आर्थिक स्थिती नसल्याने ते लग्न मोठ्या प्रमाणात करु शकत नाही. त्यामुळं ती प्रत्येक वर्षी एका गरीब मुलीचे लग्न मोठ्या धामधमीत करणार आहे. 

मुलीच्या जन्मानंतर देतात शुभेच्छा

तृतीयपंथी नैना या मुलीच्या जन्मानंतर लोकांच्या घरी जाऊन मुलींचा शुभेच्छा व आशीर्वाद देतात. तेव्हा ते पालकांकडून एक रुपयाही घेत नाहीत. जेणेकरुन लोक मुलींना भार नाही तर लक्ष्मी म्हणून त्यांच्यावर प्रेम करतील. नैना यांनी आत्तापर्यंत 15 हून अधिक मुलींना लग्न करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. 10 मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहेत. सरकारी विद्यालयात विद्यार्थिनींसाठी सुस्वच्छ शौचालयदेखील तिने उभारले आहेत.