मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?

Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 8, 2024, 09:26 AM IST
मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय? title=

Modi Cabinet Formula : एनडीए सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनाचा प्रस्ताव दिला आहे. रविवारी 9 जूनला मोदी सरकार 3.0 मंत्रिमंडळातील मंत्री शपथ घेणार आहे. त्यापूर्वी मोदी 3.0- कॅबिनेट फॉर्म्युला ठरलायचं सूत्रांनी सांगितलंय. घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपद देणार देण्यात येणार आहे. तर घटक पक्षांना 7 कॅबिनेट, 11 राज्यमंत्रिपद मिळणार आहेत. शिवाय TDP आणि जेडीयूला प्रत्येकी 2-2 मंत्रिपद देण्यात येणार असं सूत्रांनी सांगितलंय. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कारण मोदी 3.0- कॅबिनेट शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळणार असल्याच बोलं जातंय.

एनडीए सरकारमधील मंत्रिमंडळाचं समीकरण काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. भाजपकडून 18 मंत्री असणार असून एलजेपी, जेडीएस, एचएएममधून प्रत्येकी एक मंत्री करण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटक पक्षांकडून एकूण 18 मंत्री केले जाणार आहेत. यात घटक पक्षांच्या 7 कॅबिनेट मंत्र्यांची बदली ऐवजी आता घटक पक्षांना 11 राज्यमंत्रीपदेही देण्यात आली आहेत. टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी 2 मंत्री असतील, असं सूत्रांनी सांगितलंय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), एलजेपी, जेडीएस, एचएएममधून प्रत्येकी एक मंत्री करण्यात येईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप स्वत:कडे गृह, अर्थ , संरक्षण आणि परराष्ट्र खाते ठरणार आहे. सध्या रेल्वे,अर्थ आणि कृषी खात्यासाठी जेडीयू आग्रही आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या सूत्रावर जेडीयू तसंच टीडीपी काय निर्णय घेणार हे चित्रही लवकरच स्पष्ट होईल. 

मोदी सरकारचा 3.0 चा 9 जूनला शपरथविधी 

नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आलीय. तर  9 आणि 10 जूनला संपूर्ण दिल्लीत नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलाय. तर ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅराजंपरला बंदी असणार आहे. रिमोट ऑपरेटेड फ्लाइंग मशिन्सच्या वापरालाही बंदी आहे. 

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी त्यांना शपथविधीसाठीचं आमंत्रण दिलं. मोदी लवकरच नव्या मंत्रिमंडळ सदस्यांची यादी राष्ट्रपतींना सादर असं समजतंय.