'पंतप्रधान बनण्याचा विचार देखील मी करु शकत नव्हतो'

 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' या फेसबुक पेजवर शेअर झालेल्या पोस्टमधून पंतप्रधानांच्या न सांगितलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत. 

Updated: Jan 6, 2019, 02:08 PM IST
'पंतप्रधान बनण्याचा विचार देखील मी करु शकत नव्हतो' title=

नवी दिल्ली : पंतप्रधान बनण्याचा विचार करणं ही देखील माझ्यासाठी खूप दूरची गोष्ट होती असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' या फेसबुक पेजवर शेअर झालेल्या पोस्टमधून पंतप्रधानांच्या न सांगितलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. माझ्या आईकडे शिक्षण नव्हते पण सर्वप्रकारच्या आजारपण आणि दुखण्यावर इलाज होता अशी आठवणही त्यांनी सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारात एकूण 8 सदस्य होते. जे 40 बाय 12 फूटच्या घरात राहत होते. हे घर लहान होते पण या सर्वांसाठी पुरेसे होते. आमच्या दिवसाची सुरूवात दररोज सकाळी 5 वाजता व्हायची. तेव्हा माझी आई नवजात आणि लहान बाळांना पारंपारिक औषधांनी बरी करायची. तेव्हा मी आणि माझा भाऊ चूलं पेटवायचो जेणेकरुन आईला मदत होईल असे त्यांनी म्हटले आहे.

चहाच्या दुकानावर हिंदी शिकलो

 लहानपणीचा दिनक्रम सांगताना त्यांनी वडीलांच्या चहाच्या दुकानाचा देखील उल्लेख केला. रेल्वे स्थानकावर असलेलं वडीलांचे चहाचे दुकान उघडायचं, साफसफाई करायची आणि त्यानंतर शाळेत जायचं असा माझा दिनक्रम असे पंतप्रधानांनी सांगितले. शाळा जितक्य लवकर सुटेल तितक्या लवकर मला वडीलांच्या मदतीसाठी यावं लागायचं असेही ते म्हणाले. देशभरातील लोक भेटण्याची मी तिथे वाट पाहायचो. त्यांना चहा देणं आणि त्यांच्याकडून कहाणी ऐकणं यामुळेच मला हिंदी बोलायला येऊ लागल्याचेही ते म्हणाले. 8 वर्षाच्या चहा देणाऱ्या नरेंद्र मोदीला त्यावेळी कोणी तू पंतप्रधान होशील का ? असे विचारले असते तर उत्तर नाही..कधीच नाही..हा विचार देखील मी करु शकत नाही असेच उत्तर दिले असते असे त्यांनी स्पष्ट केले.  

मुंबई स्वप्नांच शहर 

 पंतप्रधानांना लहानपणी मुंबई बद्दल आकर्षण होतं. चहाच्या दुकानात येणारे व्यापारी आपापसात मुंबई  बद्दल बोलत असत. हे ऐकून मी चकित व्हायचो. भविष्यात कधीतरी आपल्या स्वप्नातलं शहर असलेल्या मुंबईत जाईन आणि बघेन असं वाटायचं असे ते म्हणाले. मी लहानपणापासून जिज्ञासू होतो. मला प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची आवड होती. मी वाचनालयात जायचो आणि जे मिळेल ते वाचायचो असेही ते म्हणाले.