पंतप्रधान मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण!

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांची आठवण काढली. 

Updated: Jan 23, 2018, 08:40 AM IST
पंतप्रधान मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण! title=

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांची आठवण काढली. 

मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच एक शूर नेते म्हणून लक्षात राहतील. ते लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झटत राहिले’. 

आज बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवशी शिवसेना पक्षाची कार्यकारिणी बैठक आहे. यात बैठकीतून शिवसेनेत अनेक बदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. युवानेते आदित्य ठाकरे यांनी नेतेपदी निवडले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.