'या' ठिकाणी उभारणार नरेंद्र मोदींचं मंदिर !

पंतप्रधान मोदींचे भारताबाहेर देखील अनेक चाहते आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 5, 2017, 11:41 PM IST
'या' ठिकाणी उभारणार नरेंद्र मोदींचं मंदिर ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींचे भारताबाहेर देखील अनेक चाहते आहेत. त्यांच्या कुर्ता, जॅकेट आणि स्टाईलची तर सर्वत्र चर्चा असते. त्याचबरोबर मोदींचा प्रभाव इतका आहे की काहीजण तर त्यांचे भक्त आहेत. मोदींची देवाप्रमाणे पूजा करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचे मंदिर बनवण्याची घोषणा केली आहे.  

ही घोषणा करणारी व्यक्ती निवृत्त अभियंता आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले जाणार आहे. यासाठी ५ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. याठिकाणी मोदींची १०० फुटी मूर्ती उभारली जाणार आहे. मोदींची लोकप्रियता लक्षात घेऊन या व्यक्तीने मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी देखील अनेक नेत्यांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा समावेश आहे. 

नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील राजकोट येथे यापूर्वीच एक मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात मोदींची मुर्ती स्थापित करण्यात आली असून या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम ट्रस्टद्वारे चालते.