मध्यरात्री ३ नंतर उल्कावर्षाव पाहता येणार

 १.५ अब्ज डॉलरची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. 

Updated: Aug 12, 2018, 05:51 PM IST

नवी दिल्ली : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाचं 'पार्कर सोलर प्रोब' यान सूर्याच्या दिशेनं झेपावलंय. सूर्याचा करोना हा त्याच्या पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का,  याशिवाय अनेक महत्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न हे यान करणारय. सूर्याच्या करोनामधून सौर वादळाची उत्पत्ती होते. त्यामुळे या मिशनला अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मिशन मानलं जातंय. १.५ अब्ज डॉलरची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.

सूर्याच्या सातपट जवळ

आतापर्यंत कोणतंही मानवनिर्मित यान सूर्याच्या जवळ गेलेलं नाही. सोलर प्रोब यान दुसऱ्या यानांच्या तुलनेत सूर्याच्या सातपट अधिक जवळ जाणारय. इजीन पार्कर या ९० वर्षीय खगोलशास्त्रज्ञानं सौर वादळांसंदर्भात सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या यानाला पार्कर सोलर प्रोब’ असं नाव देण्यात आलंय.