निसर्गाची किमया आणि फोटोग्राफरची कमाल, एकाच फ्रेममध्ये राष्ट्रीय पक्षी आणि प्राणी

सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.    

Updated: Aug 30, 2020, 05:04 PM IST
निसर्गाची किमया आणि फोटोग्राफरची कमाल, एकाच फ्रेममध्ये राष्ट्रीय पक्षी आणि प्राणी

मुंबई : आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात सोशल मीडिया हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे. कोणतीही नवी गोष्टी बघितली किंवा ऐकली तर कित्येत लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचवतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो. या माध्यमावर रोज अनेक व्हिडिओ, फोटो पोस्ट होत असतात. त्यातील काही काही क्षणांतचं लोकप्रिय होतात. सध्या सोशल मीडियावर एक अनोखा फोटो व्हायरल होत आहे. 

या फोटोमध्ये राष्ट्रीय पक्षी आणि प्राणी एकाच फ्रेममध्ये दिसून येत आहे. याला निसर्गाची कियमा आणि फोटोग्राफरची कमाल म्हणणं वावगं ठरणार नाही.  हिरवा गालीछा अंथरलेल्या जंगलामध्ये मोर आणि वाघ एकमेकांकडे बघत असतानाचे हे नयन रम्य दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

निसर्गाची सुंदर गोष्ट सांगणारं हे चित्र शुजात मोहम्मद यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. आयआयएस अधिकारी अंकुर लाहोटी यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.