अत्यंसस्कारासाठी कमी पडतायतं लाकडं; मृतांचा आकडा 100 च्या पार; UP, बिहारमध्ये भयानक स्थिती

उत्तर प्रदेशात आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधित फटका हा बलिया जिल्ह्याला बसलाय. 15 ते 17 जून या तीन दिवसांत  400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

वनिता कांबळे | Updated: Jun 21, 2023, 05:31 PM IST
अत्यंसस्कारासाठी कमी पडतायतं लाकडं; मृतांचा आकडा 100 च्या पार; UP, बिहारमध्ये भयानक स्थिती title=

Heatwave in UP:  बिहार आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट आली असून मृतांचा आकडा वाढत असल्याने परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक होत चालली आहे.  उष्माघातने मृत्यू झालेल्या मृतांचा आकडा शंभरच्यावर गेला आहे. यामुळे स्मशानात अत्यंसस्कारासाठी लाकड कमी पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. उष्णाघातामुळे होणाऱ्या मृतांच्या आकडा वाढत असल्याने आरोग्य यंत्रेणेची झोप उडाली आहे. कोरोनना काळातही उत्तर प्रदेशात स्मशानभूमीबाहेर अत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग लागली होती. उत्तर प्रदेशातील सध्याची स्थिती पाहता कोरोना काळ आठवून नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. 

स्मशानभूमीबाहेर अत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग 

गंगा नदी किनारे महुली घाटावर मोठ्या प्रमाणात मृतदेह अत्यसंस्कारासाठी आणले जातात. स्मशानभूमीबाहेर अत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग लागली आहे. येथे इतके मृतदेह अंत्यस्कारासाठी येत आहेत की अत्यंसस्कारासाठी लाकडं कमी पडत असल्याचे येथे काम करणारे कर्मचारी सांगत आहेत. अचानक येथे मोठ्या प्रमाणात मृतदेह अत्यसंस्कारासाठी येत असल्याने लाकडं अपुरी पडत आहेत. अत्यंसस्कारासाठी तातडीने लाकडं उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे स्मशानभूमी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. अशीच स्थिती उत्तर प्रदेशात देखील पहायाल मिळत आहेत. 

उष्माघाताचा हाहाकार

बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्माघाताने हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेशातील स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. 19 जून रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. 600 हून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही देखील समोर आले होते. 3 दिवसातील ही आकडेवारी होती. 

सरकारी रुग्णालयातील आकडेवारी उपलब्ध

बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारकडे फक्त सरकारी रुग्णालयात मृत झालेल्या तसेच दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारी आहे.  खाजगी रुग्णालयातील तपशील समोर आलेला नाही.  संपूर्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये देखील अशा प्रकारे रुग्ण दाखल झालेले असावेत अशी शंका देखील उपस्थित केली जात. दरम्यान, उष्माघातामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होणे शक्य नाही. यामुळे यामागे वेगळे कारण देकील असू शकते अशी शंका आरोग्य यंत्रणेने उपस्थित केली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. 

आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यामुळे योगी सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी प्रशासन आणि अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.