Gemology: 'या' रत्नात रातोरात श्रीमंत बनवण्याची ताकद, 24 तासांत दिसतो प्रभाव

Neelam Gemstone Power: कुंडलीतील कमजोर शनि मजबूत करण्यासाठी आणि शनीच्या शुभ प्रभावासाठी निळा नीलम धारण करण्याचे रत्नशास्त्रात सांगितले आहे. 

Updated: Dec 23, 2023, 02:56 PM IST
Gemology: 'या' रत्नात रातोरात श्रीमंत बनवण्याची ताकद, 24 तासांत दिसतो प्रभाव title=

Neelam Gemstone Power: व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काही ग्रह शुभ स्थितीत असतात तर काही ग्रह अशुभ स्थितीत असतात. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कुंडलीतील कमकुवत ग्रह मजबूत करण्यासाठी रत्न शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या रत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. जर हे नियमित धारण केले तर त्या व्यक्तीला चांगले परिणाम दिसतात. तसेच व्यक्तीचे सौभाग्य वाढते, असे शास्त्रात म्हटले जाते. 

कुंडलीतील कमजोर शनि मजबूत करण्यासाठी आणि शनीच्या शुभ प्रभावासाठी निळा नीलम धारण करण्याचे रत्नशास्त्रात सांगितले आहे. हे रत्न योग्य पद्धतीने परिधान केले तर 24 तासांच्या आत प्रभाव दाखवते, असा विश्वास व्यक्त केला जातो. ज्योतिषास्त्रानुसार, नीलम एखाद्या व्यक्तीला अनुकूल असेल तर त्याचे नशीब रातोरात बदलण्यास वेळ लागत नाही. असे असले तरीही हे रत्न एखाद्या व्यक्तीला अनुरूप नसल्यास सर्वकाही वाया जाण्यास जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ज्योतिषास्त्रानुसार नीलम रत्न धारण करण्यापूर्वी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

या 2 राशींसाठी फायदेशीर 

नीलम रत्न विशेषतः मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. या दोन राशींवर शनीचे वर्चस्व आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि कमकुवत स्थितीत असेल तर निळा नीलम रत्न धारण करून त्याची शक्ती वाढवता येते. ज्योतिषांच्या मते, कुंडलीत शनि चौथ्या, पाचव्या, दहाव्या आणि अकराव्या भावात असताना नीलम धारण करणे खूप फायदेशीर आहे. नीलमणी कोरल, माणिक आणि मोती धारण केल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, असे रत्न ज्योतिषात सांगितले गेले आहे. 

नीलम धारण करण्याचे फायदे 

निळा नीलम रत्न परिधान केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळतेच पण निद्रानाश झाल्यास निळा नीलम रत्न धारण करता येतो. नीलम रत्न धारण केल्याने व्यक्ती निरोगी बनते आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. एवढेच नव्हे तर निळे रत्न परिधान केल्याने व्यक्तीचा आदर वाढतो, असे ज्योतिषास्त्रात म्हटले आहे.

नीलम रत्न धारण करण्याची पद्धत

रत्न ज्योतिषानुसार, नीलम रत्न धारण करण्यासाठी किमान 7 ते 8.25 रत्ती असते. यातून मिळणाऱ्या शुभ परिणामांसाठी नीलमला पंचधातूमध्ये जडवले जाते आणि अंगठीमध्ये परिधान केले जाते. हे रत्न डाव्या हातात धारण करावे. निलम रत्न शनिवारी मध्यरात्री घालणे ही योग्य वेळ मानली जाते. निलम रत्नाची अंगठी घालण्यापूर्वी गंगाजल आणि गाईच्या दुधाने शुद्ध करा. निळा नीलम धारण केल्यानंतर काळे कापड, मोहरीचे तेल, लोखंड, काळे तीळ, संपूर्ण उडीद, जवस, काळी फुले, कस्तुरी, चामडे आणि काळी घोंगडी इत्यादी शनि ग्रहाशी संबंधित वस्तू दान कराव्या, असेही ज्योतिषास्त्रात म्हटले आहे. 

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)