Rohit Sharma: खूप चुका केल्या...; मुंबई इंडियन्सच्या पराभवाला रोहितने कोणाला ठरवलं दोषी?

Rohit Sharma: आयपीएलच्या या संपूर्ण सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचं लक्ष रोहित शर्मावर होतं. मुळात यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच टीममध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. सिझनपूर्वीच रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. 

सुरभि जगदीश | Updated: May 19, 2024, 09:13 AM IST
Rohit Sharma: खूप चुका केल्या...;  मुंबई इंडियन्सच्या पराभवाला रोहितने कोणाला ठरवलं दोषी?  title=

Rohit Sharma: यंदाचा आयपीएलचा सिझन मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी फार खराब गेला. अखेर लखनऊविरूद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या सिझनचा अंत देखील झाला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या टीमला लखनऊविरूद्धच्या सामन्यात 18 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी पॉईंट्स टेबलमध्ये देखील केवळ 8 पॉईंट्सने मुंबईची टीम तळाला आहे. दरम्यान मुंबईच्या टीमच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, याबाबत टीमचा माजी कर्णधार रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. 

आयपीएलच्या या संपूर्ण सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचं लक्ष रोहित शर्मावर होतं. मुळात यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच टीममध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. सिझनपूर्वीच रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. यावेळी हार्दिक पांड्याला सतत चाहत्यांच्या रोषाला बळी पडावे लागले. इतकंच नाही तर काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर रोहित शर्माचा फॉर्मही घसरला. त्यामुळेच मुंबईला सिझनमध्ये कमबॅक करता आलं.

रोहित शर्माने कोणाला ठरवलं दोषी?

मुंबईने आयपीएलच्या या सिझनमध्ये 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले. अशा परिस्थितीनंतर टीमच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊ लागलं. प्रत्येकजण यासाठी वेगवेगळी कारणं देताना दिसतंय. जिओ सिनेमाशी बोलताना रोहित म्हणाला की, टीमच्या कामगिरीसाठी सर्व खेळाडू जबाबदार आहेत कारण संपूर्ण सिझनमध्ये प्रत्येकाने खूप चुका केल्या. आयपीएल 2024 टीमच्या योजनेनुसार झाले नाही.

काय म्हणाला रोहित शर्मा?

मुंबईसाठी 5 विजेतेपद जिंकूनही कर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या रोहितने टीमकडून कुठे चुका झाल्या हे सांगितलंय. रोहित म्हणाला की, आयपीएलमध्ये फक्त काही संधी उपलब्ध आहेत आणि तेव्हाच त्या संधींचा फायदा घेतला पाहिजे. जे मुंबईने केलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की, असे काही सामने होते जे टीमने जिंकायला पाहिजे होते, मात्र त्यातही पराभवाचा सामना करावा लागला.

स्वतःच्या फलंदाजीबाबत हिटमॅनचं मोठं विधान

कर्णधारपदावरून हटल्यानंतर रोहितने या सिझनमध्ये केवळ फलंदाज म्हणून खेळणं सुरू ठेवलं होतं. रोहितने 2019 नंतर प्रथमच एका सिझनमध्ये 400 हून अधिक रन्स केले. यावेळी त्याने 14 डावात 417 रन्स केल्या पण चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या सामन्यांमध्ये तो त्याला चांगला खेळ करता आला नाही. यावेली रोहितने कबूल केले की त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही पण जास्त विचार करण्यात अर्थ नाही कारण अशा परिस्थितीत तो चांगला खेळू शकणार नाही. 

रोहितच्या म्हणण्यानुसार, चांगली कामगिरी करण्यासाठी त्याची मानसिक स्थिती चांगली असणे, चांगला सराव करणं महत्त्वाचे आहे आणि संपूर्ण सिझनमध्ये मी हेच केलं. फलंदाज म्हणून मला माहीतीये की, मी अपेक्षेप्रमाणे खेळू शकलो नाही. 

मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. मी सराव करत राहतो आणि माझ्या चुकांवर काम करत राहतो. आमच्यासाठी चांगला सिझन गेला नाही आणि आम्ही स्वतःला दोषी ठरवतो कारण आम्ही खूप चुका केल्या, असंही रोहितने म्हटलं आहे.

रोहित शर्माने असंही सांगितलं की, 2024 च्या टी-20 वर्ल्डकपसाठी 70 टक्के टीम आयपीएलपूर्वीच ठरवण्यात आली होती. आयपीएलमधील कामगिरीत चढ-उतार आहेत. आम्ही त्यावर जास्त लक्ष केंद्रित केले नाही. भारत 5 जून रोजी टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.