Shani Vakri 2024: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह गोचरसोबत वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. येत्या काळात शनी वक्री स्थितीत जाणार आहे. शनीच्या वक्री स्थितीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
30 जून रोजी पहाटे 12.25 वाजता शनि वक्री होणार आहे. यावेळी शनीदेव या ठिकाणी 139 दिवस या स्थितीत राहणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:51 वाजता मार्गी होणार आहे. शनी वक्री असल्यामुळे काही राशीच्या लोकांसाठी यावेळी अडचणी वाढू शकतात. मात्र दुसरीकेड काही राशी आहेत ज्यांना भरपूर लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
शनी दहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला लाभ मिळू शकतो. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता.
मकर राशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी आहे. पैशाशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होऊ शकते. या कालावधीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात.
शनीच्या वक्री स्थितीने कामानिमित्त काही प्रवास करावा लागू शकतो. कामाची इच्छा प्रबळ राहील. तुम्ही कुटुंबीय किंवा मित्रांसह धार्मिक स्थळी जाऊ शकता. दीर्घकाळ चाललेला आजार आता बरा होऊ शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )