खुशखबर! 'या' राज्यामध्ये वाढणार मेडिकलचे सीट; भावी डॉक्टरांसाठी मोठा दिलासा

भावी डॉक्टरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Updated: Jul 31, 2022, 03:20 PM IST
खुशखबर! 'या' राज्यामध्ये वाढणार मेडिकलचे सीट;  भावी डॉक्टरांसाठी मोठा दिलासा title=

MBBS Seats : आता बातमी आहे मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. भावी डॉक्टरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेडिकलमध्ये सीट उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी हुकते. आता काळजी करण्याची गरज नाही, कारण केंद्र सरकारने मेडिकलचे सीट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 16 राज्यांमधील MBBSच्या 3495 सीट वाढविण्यात येण्याची तयारी सुरु केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मंडाविया यांनी याबद्दल संकेत दिले आहेत. 

काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री?

लोकसभा खासदार डॉ हिना गावित आणि डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनुसख मंडाविया यांनी MBBSच्या सीटबद्दल माहिती दिली. ''सरकारी मेडिकल महाविद्यालये CSS योजनेतर्गंत अपग्रेट करण्यात येणार आहे. या योजनेतर्गंत सध्याच्या मेडिकल कॉलेजमधील  MBBSच्या जागा वाढविण्यात येणार आहे. ''

कोणत्या राज्यात किती सीट?

राजस्थान - 700
मध्य प्रदेश - 600
कर्नाटक - 550
तामिळनाडू - 345
गुजरात - 270
ओडिशा - 200
आंध्रप्रदेश - 150 
महाराष्ट्र - 150 
झारखंड - 100
पंजाब - 100
पश्चिम बंगाल - 100
जम्मू-काश्मीर - 60 
मणिपूर - 50 
उत्तर प्रदेश - 50 
उत्तरखंड - 50 
हिमाचल प्रदेश - 20

सध्या सर्व सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या एकूण 91,927 जागा आहेत. यापैकी सरकारी कॉलेजमध्ये 48,012 तर खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये 43,915 जागा आहेत. सध्या तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 10,754 सीट आहेत. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकमध्ये 10,145 जागा आहेत. तर या लिस्टमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रात 9895 मेडिकलचे सीट आहेत. तर उत्तर प्रदेशात 9053 जागा आहेत.