Nepal Plane Crash Update : नेपाळमधील पोखरा (Pokhara) इथे विमानतळावर उतरताना रविवारी (15 जानेवारी) ला विमान अपघातानंतर (Plane Crash) एकच खळबळ माजली. या दुर्घटनेत मिळालेल्या माहितीनुसार 68 प्रवाशांना मृत्यूने कवटाळलं. या विमानातील चार केबिन क्रू सदस्यांचाही दुदैवी निधन झालं. या विमान अपघातात उत्तर प्रदेशातील 5 मित्रांचाही करुण अंत झाला आहे. या अपघातानंतर दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर येतं आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबद्दल अधिकृत पुष्टी आलेली नाही. पण या विमानाच्या को पायलटची कहाणी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
हो, नियती तुम्हाला कधी काय दाखवेल याची कोणीही कल्पनाही करु शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात कोसळलेल्या को पायलट अंजू खतिवडा यांची कहाणी काळजाला भिडणारी आहे. अंजू यांच्यासाठी पुढे नियतीने काय मांडून ठेवलं होतं याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. पण या विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर त्या कॅप्टन बनणार होत्या. त्यांची बढती होणार होती. त्यामुळे त्या खूप आनंदी होत्या. पण अंजू यांच्यासाठी हे शेवटचं उड्डाण ठरलं. पायलट होण्यासाठी किमान 100 तास उड्डाणाचा अनुभव आवश्यक असतो. या विमान लँडिंगनंतर अंजू यांच्या हा अनुभव पूर्ण होणार होता पण त्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठलं. दरम्यान या विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन कमल केसी यांच्याकडे 35 वर्षांचा अनुभव होता. त्यांनी अनेक पायलटना प्रशिक्षिन दिलं आहे. (Nepal Plane Crash Video co pilot anju khativada 16 years ago her husband passed away in a plane crash nepal plane crash update kathmandu pokhara flight accident)
Anju Khatiwada, co-pilot of the ill-fated #YetiAirlines, was just few seconds away from landing & fulfilling the requirement to become a Captain. Tragically, her husband (also a co-pilot) had died in a plane crash in 2006. What a terrible & cruel twist of fate #NepalPlaneCrash pic.twitter.com/w1TpJ0Tl6a
— Atul Karmarkar (@atulkarmarkar) January 16, 2023
हा कसा योगायोग आहे, अंजू यांचे पती दीपक पोखरेल यांच्याही विमान अपघातातच मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे ते विमानदेखील यती एअरलाइन्सचं होतं. 16 वर्षांपूर्वी म्हणजे 21 जून 2006 रोजी अंजू यांच्या पतीचा को पायलट असताना विमान अपघातात निधन झालं. जुमला ते नेपाळगंजहून सुर्खेतला जाणारे यति एअरलाइन्सचे 9N AEQ विमान कोसळले होते ज्यात 6 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. दरम्यान नेपाळ विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.