गुन्हेगारीत देशात 'हे' राज्य अव्वल!

राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) गुरूवारी गुन्हेगारीचे प्रमाण जाहीर केले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 1, 2017, 09:51 AM IST
गुन्हेगारीत देशात 'हे' राज्य अव्वल! title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) गुरूवारी जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, दिल्लीत गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

अव्वल ठरली राजधानी

२०१६ मध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) नुसार देशात घडलेल्या गुन्हांत ३८.८% हिस्सा दिल्लीचा असल्याने या क्रमवारीत दिल्ली अव्वल ठरली आहे.

दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर 

त्यानंतर ८.९% गुन्हे हे बंगळूर येथे घडलेले असल्याने या क्रमवारीत हे राज्य दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत ७.७% गुन्हांची नोंद झाली आहे.

देशभरात इतके गुन्हे

बलात्कार, हत्या, अपहरण यांसारख्या एकूण ४८,३१,५१५ गुन्हांची नोंद देशभरात झाली आहे. यात २९,७५,७११ गुन्हे हे आयपीसीच्या अंतर्गत येतात. तर १८,५५,८०४ गुन्हे विशेष व स्थानीय कायद्यासंबंधित श्रेणीत येतात. २०१५ मध्ये देशभरात एकूण ४७,१०,६७६ गुन्हांची नोंद झाली होती.