मुंबई : नवीन जनरेशन मारूती सुझुकी सेलेरियो भारतात लाँच केली आहे. ज्याची एक्सशोरूमची किंमत 4.99 लाख आहे. टॉप मॉडेलची किंमत 6.94 लाख रुपये आहे. जुन्या मॉडेलपेक्षा नवीन जनरेशन सेलोरिया पूर्णपणे बदलली आहे. नव्या फिचर्ससह ही कार लाँच झाली आहे.
सेलेरियोला कंपनी नैक्सा डीलरशिपच्या माध्यमातून विकणार आहे. या कारकरता 11,000 हजार रुपयांचं बुकिंग करू शकता. मारूती सुझुकी इंडियाद्वारे दोन वर्षांनंतर देशात लाँच केलेली नवीन जनरेशन कार आहे.
सेलेरियो एलएक्सआई एमटी - रु 4,99,000
सेलेरियो वीएक्सआई एमटी - रु 5,63,000
सेलेरियो वीएक्सआई एएमटी - रु 6,13,000
सेलेरियो झेडएक्सआई एमटी - रु 5,94,000
सेलेरियो झेडएक्सआई एएमटी - रु 6,44,000
सेलेरियो झेडएक्सआई प्लस एमटी - रु 6,44,000
सेलेरियो झेडएक्सआई प्लस एएमटी - रु 6,94,000
मारुती सुझुकीची ही पहिली कार आहे ज्यामध्ये नवीन जनरेशन 1.0-लीटर के-सीरीज पेट्रोल देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे इंजिन मागील मॉडेलच्या तुलनेत 23 टक्के जास्त इंधन वाचवते. भारतीय प्रवासी कार बाजारात सर्वात जास्त पेट्रोल-बचत करणारी कार म्हणूनही ओळखले जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी कंपनी सतत इंजिनच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामध्ये पेट्रोलची बचत करण्यावरही खूप लक्ष दिले जात आहे.
मारुती सुझुकीचा दावा आहे की, ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 26.68 किमी पर्यंत चालवता येते. कारची बूट स्पेस 313 लीटर आहे .जी जुन्या मॉडेलपेक्षा 40 टक्के जास्त आहे. कंपनीने लॉन्च दरम्यान सांगितले की, नवीन Celerio च्या CNG प्रकारावर काम सुरू आहे आणि ते लवकरच बाजारात आणले जाईल.
फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, पुश-बटण स्टार्ट-स्टॉप, हाईट-अडजस्टेबल ड्राइवर सीट, स्टीयरिंगवर कंट्रोल, इलेक्ट्रिकवर फोल्ड होणारे ओआरवीएम,15 - इंचच्या ब्लॅक फिनिशवर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये दोन एअरबॅग, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स आणि अशी अनेक वैशिष्ट्ये सामाईकपणे कारमध्ये देण्यात आली आहेत. कारचे केबिन पूर्णपणे नवीन अवतारात सादर केले गेले आहे जिथे तुम्हाला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि Apple CarPlay सह Android Auto कनेक्टिव्हिटी मिळेल.
नवीन पिढीच्या मारुती सुझुकी सेलेरियोचा आकार देखील 55 मिमी रुंदीसह वाढला आहे, तर दरवाजा आता 48 मिमी अधिक उघडतो, ज्यामुळे कारमध्ये प्रवेश करणे आणि बाहेर जाणे सोपे होते. पूर्वीच्या प्रवाशांसाठीही केबिनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.