New Hyundai Venue features: कॉस्मॅटिक एन्हान्समेंट, मेकॅनिकल अपडेट्स आणि आंतरिक संशोधन करून भारतीय बाजारात i20 एन लाईन कार विकणारी ह्युंदाई कंपनी आता भारतीय बाजारात आणखी एक मोठा धमाका करणार आहे. ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच (HMIL) 6 सप्टेंबररोजी भारतीय बाजारात व्हेन्यू एन लाईन ही आपली नवी कार घेऊन येणार आहे.
कॉम्पॅक्ट SUV स्वरूपात बाजारात येणाऱ्या या कारचे फोटो याआधीच समोर आले आहेत. नव्या लूकबाबत ग्राहकांची चांगली प्रतिक्रिया पाहायला मिळतेय. सेन्शुअस स्पोर्टीनेस डिझाईन या थीमवर आधारावर ही नवी कार भारतीय बाजारात पदार्पण करण्यास सज्ज आहे.
सध्या भारतीय कार्सच्या बाजारात प्रचंड स्पर्धा पाहायला मिळते. अशात सध्याच्या मार्केटमध्ये आपली छाप पाडण्यासाठी कंपनीकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यामाध्यमातून कंपनी इतर स्पर्धकांना थेट टक्कर देताना पाहायला मिळेल.
i20 N लाईन गाडीत सध्या सहा गिअर्स iMT आणि सेवन स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे दोन्ही पर्याय असू शकतात. नव्या ह्युंदाई व्हेन्यूमध्ये तुम्हाला तगडी इन्फोटेनमें सिस्टीम, बोस ऑडिओ, सहा एअर बॅग्स, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि इतर जबरदस्त फीचर्स अनुभवायला मिळतील.
new hyundai venue car ready to come in indian market know all specs