संकट काही संपेना, कोरोनानंतर आता या नव्या इंफेक्शनचे रुग्ण आले समोर

भारतात कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नाही. कोरोना रुग्णांची वाढ कमी झाली असली तरी मात्र इतर आजारांनी चिंता वाढवल्या आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर अनेक जणांना आता इतर आजारांचा त्रास होत आहे. डॉक्टर देखील या नव्या आजारामुळे चिंता व्यक्त करत आहेत. काळ्या, पांढर्‍या आणि पिवळ्या फंगस नंतर आता आणखी एक नव्या बुरशीचा प्रकार समोर आला आहे.

Updated: May 28, 2021, 07:19 PM IST
संकट काही संपेना, कोरोनानंतर आता या नव्या इंफेक्शनचे रुग्ण आले समोर title=

मुंबई : भारत अद्याप कोरोनापासून मुक्त झालेला नाही. कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी इतर अनेक प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गामुळे प्रत्येकाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत देशभरात काळ्या बुरशीचे एकूण 11 हजार रुग्ण आढळले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्र ही सर्वाधिक रुग्ण असलेली राज्ये आहेत. गुजरातमध्ये काळ्या बुरशीचे रुग्ण सतत वाढत आहेत, या दरम्यान, वडोदराच्या डॉक्टरांसमोर नवीन प्रकारचे बुरशीजन्य प्रकरण आलं आगे. काळ्या, पांढर्‍या आणि पिवळ्या फंगस नंतर, एस्परगिलोसिस (Aspergillosis) नावाच्या बुरशीचेही प्रकार आढळले आहेत.

काळ्या बुरशीसारखे एस्परगिलोसिस संसर्ग, कोविडमधून (covid 19) नुकतेच बरे झालेल्या लोकांमध्ये दिसून येते. गुरुवारी वडोदरामध्ये काळ्या बुरशीचे 262 आणि एस्परगिलोसिसचे आठ रुग्ण आढळले. या सर्व 8 रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एस्परगिलोसिस संसर्ग म्हणजे काय?

एस्परगिलोसिस हे एक प्रकारचे बुरशी संक्रमण आहे. एस्परगिलोसिस संसर्गामुळे होणारे आजार सामान्यत: श्वसन प्रणालीवर परिणाम करतात परंतु त्यांची लक्षणे आणि तीव्रता वेगवेगळे असू शकतात. रोगाचा त्रास देणारी ही एस्परगिलोसिस बुरशी घराच्या आत आणि बाहेर सर्वत्र आढळते.

बहुतेक लोकांच्या श्वसनाद्वारे एस्परगिलोसिस बिजाणू शरीरात प्रवेश करतात, परंतु ते आजारी पडत नाहीत. परंतु अशक्तपणामुळे खराब प्रतिकारशक्ती किंवा फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांना याचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो.

एस्परगिलोसिस सामान्यत: अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे. सध्या कोविड रूग्णांमध्ये दिसणारा साइनस पल्मोनरी एस्परगिलोसिस फारच कमी आहे. तज्ञांचं असं मत हे की, एस्परगिलोसिस हा काळ्या बुरशीजन्य संसर्गाइतका प्राणघातक नसून कधीकधी प्राणघातक देखील सिद्ध होऊ शकते.

कोणत्या लोकांना धोका ?

कोविड रूग्णांमध्ये अनेक बुरशीजन्य संसर्ग होण्याचे कारण स्टिरॉइड्स आणि खराब प्रतिकारशक्ती असल्याचे मानले जाते. तसेच, ऑक्सिजन पुरवठा हायड्रेट करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर न करणे. हे कारण देखील दिले गेले आहे. कोविडच्या उपचारात स्टिरॉइडचा जास्त प्रमाणात उपयोग करणे ही काळ्या बुरशीच्या वाढत्या घटनामागील प्रमुख कारण आहे. हेच कारण आहे की स्टिरॉइड्सच्या अत्यधिक वापराविरूद्ध आरोग्य तज्ञांनी सावधानेचा इशारा दिला आहे.