उत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 14, 2017, 12:46 PM IST
उत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी   title=

लखनऊ :  उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय. विधानसभेत स्फोटके आणणे हे देशाला अपमानित करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटलेय.

उत्तर प्रदेशमधील विधानसभेत बुधवारी स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत ( NIA)चौकशी होणार आहे.

विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडणे हा गंभीर प्रकार आहे. विधानसभेत सापडलेली स्फोटकं हा दहशतवादी हल्ल्याचा कट असून यामागे कोणाचा हात आहे याचा उलगडा झालाच पाहिजे, असे मुख्यमंत्री योगी म्हणालेत. 

बुधवारी दुपारीच विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडले होते. मात्र सचिवालयाच्या कामकाजाची वेळ संपेपर्यंत हा प्रकार उघड करण्यात आला नाही. कर्मचारी घरी परतल्यावर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना विधानसभेत पाचारण करण्यात आले. यानंतर ही पावडर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली होती.

समाजवादी पक्षाच्या आमदाराच्या आसनाखाली एका पाकिटामध्ये स्फोटक पदार्थ सापडली होती. या घटनेने एकच खळबळ माजली होती. सुरक्षा कवच भेदून स्फोटक पदार्थ विधानसभेच्या आतमध्ये कसे आले असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात या स्फोटक पदार्थाचे नाव पीइटीएन (PETN)असल्याचे निष्पन्न झालेय. १५० ग्रॅम पीईटीएन सापडले असून संपूर्ण विधानसभा स्फोटात उडवण्यासाठी ५०० ग्रॅम पीईटीएनची गरज असते, असे त्यांनी सांगितले.