'चिदंबरम काँग्रेसचे नवाज शरीफ, परदेशात बेनामी संपत्ती'

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची स्वतःची आणि कुटुंबियांची परदेशात कोट्यवधीची बेनामी संपत्ती असून ही सगळी माहिती त्यांनी लपवली असा आरोप भाजप नेत्या आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केलाय. 

Updated: May 13, 2018, 07:15 PM IST
'चिदंबरम काँग्रेसचे नवाज शरीफ, परदेशात बेनामी संपत्ती' title=

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची स्वतःची आणि कुटुंबियांची परदेशात कोट्यवधीची बेनामी संपत्ती असून ही सगळी माहिती त्यांनी लपवली असा आरोप भाजप नेत्या आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केलाय. चिदंबरम हे काँग्रेसचे नवाज शरीफ आहेत. असा हल्लाबोल सितारमण यांनी केलाय. आयकर विभागाने दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारावरुन भाजपने चिदंबरम यांना घेरलंय. चिदंबरम यांची ब्रिटनमध्ये ५. ३७ कोटी, अमेरिकेत ३.२८ कोटी आणि केंब्रिजमध्येही संपत्ती असल्याचा दावा सीतारमण यांनी केलाय. या सगळ्याची माहिती चिदंबरम यांनी आयकर विभागापासून लपवल्याचा आरोप सीतारमण यांनी केलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या सगळ्या प्रकरणी खुलासा करुन चौकशी करणार का असा सवालही भाजपने उपस्थित केलाय.