तेज प्रताप यादवांच्या लग्नात गोंधळ, लोकांनी लूटल्या वस्तू

लालूंच्या मुलाच्या लग्नात लोकांचा गोंधळ

शैलेश मुसळे | Updated: May 13, 2018, 04:22 PM IST
तेज प्रताप यादवांच्या लग्नात गोंधळ, लोकांनी लूटल्या वस्तू title=

पटना : आरजेडी चीफ लालू प्रसाद माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या लग्नात जोरदार गोंधळ झाला. माजी मंत्री तेज प्रताप शनिवारी रात्री आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या रायसोबत विवाह बंधनात अडकले. लग्नादरम्यान अनियंत्रित गर्दीने व्हीआयपी आणि मीडियासाठी बनलेला मंडप तोडत खाण्य़ाच्या वस्तू लुटल्या. विवाहासाठी हजारो व्यक्तींसाठी व्य़वस्था करण्यात आली होती. पण लोकांनी याचे तीनतेरा वाजवले. हे सर्व आरजेडीचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातंय. काही वेळातच येथे सगळं अस्तव्यस्थ झालं.

पक्षाच्या काही नेत्यांनी लोकांना पळवण्याचा प्रयत्न केला. मीडियाच्या लोकांसोबत देखील या लोकांनी गैरव्यवहार केला. लोकांनी लग्नातल्या अनेक वस्तू चोरुन नेल्या. ज्यामध्ये भांडी, प्लेटी यांचा समावेश आहे. जेवणासाठी देखील लोकांनी गोंधळ केला.

लालू यादव यांना मुलाच्या लग्नासाठी तीन दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. त्यानंतर त्यांना 6 आठवड्यांसाठी जामीन देखील मिळाला आहे. पटनाच्या  वेटिनरी कॉलेज ग्राउंडवर हा विवाह संपन्न झाला. लग्नात विरोधी पक्षाचे नेते देखील सहभागी झाले होते. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी देखील हा विवाहाला हजेरी लावली.