मुलांकरिता नीता अंबानी यांचे 4 नियम, आजच्या यशामागचं हेच खरं रहस्य

Nita Ambani Parenting Tips : गडगंज श्रीमंत कुटुंबातील असूनही नीता अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांना अतिशय शिस्तीत वाढवले आहे. त्यांच्या पॅरेंटिंग टिप्स तुम्हालाही करतील मदत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 30, 2023, 12:58 PM IST
मुलांकरिता नीता अंबानी यांचे 4 नियम, आजच्या यशामागचं हेच खरं रहस्य  title=

Nita Ambani 4 Rules For Child : मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी कायमच आपल्या मुलांच्या बाबतीत अतिशय सतर्क असतात. एका बाजूला पॅरेंटिंगच्या नियमांमध्ये नीता अंबांनी फार कडक शिस्तीच्या आहेत तर दुसरीकडे मुलांची काळजी घेतानाही त्या मागे पुढे पाहत नाहीत. एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी खुलासा केला होता की, त्यांची तिन्ही मुले अतिशय सामान्य जीवन जगतात. श्रीमंत आणि अतिशय चर्चेत कुटुंब असलं तरीही त्या मुलांना काही अटी लागू करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांनी घरात काही नियम लागू केलेत. महत्त्वाचं म्हणजे हे नियम अंबानी कुटुंबाचे प्रमुख मुकेश अंबानी देखील पाळतात. 

कडक नियम 

नीता अंबानी मुलांसाठी अतिशय कडक शिस्तीच्या आहे. त्यांच्या नियमांनुसार मुलांनी वेळेत जेवावे, अभ्यास करावा आणि खेळातही तेवढाच रस घ्यावा. नीता अंबानी यांनी मुलांना वेळेचे महत्त्व पटवून दिले. आज वेळेची किंमत तुम्ही केलात तर उद्या वेळ तुम्हाला किंमत देईल, असं त्या म्हणतात. ईशा अंबानीने एका मुलाखतीत सांगितले होते की, कधी वडील मुकेश अंबानी यांच्याकडून सहज परवानगी मिळायची पण आई नीता अंबानी कायमच सगळी चौकशी करून विचार करून मगच परवानगी द्यायच्या. 

पैशाचे महत्त्व 

अंबानी हे अतिशय गडगंज श्रीमंत कुटुंब आहे. असं असलं तरीही नीता अंबानी यांनी तिन्ही मुलांना पैशाचे महत्त्व शिकवलं आहे. यामुळे मुलांच्या डोक्यावर पैशाची नशा नाही. नीता अंबानी मुलांसाठी पॉकेटमनी देत असतं. त्या पैशातच त्यांनी आपला खर्च करावा असा नियम लागू करण्यात आला होता. यामुळे मुलं कायमच पैशाला महत्त्व देतात. 

तिन्ही मुलांवर लक्ष 

नीता अंबानी किती व्यस्त असल्या तरीही त्यांच आपल्या तिन्ही मुलांवर लक्ष असे. आजही मुलांची लग्न झाली तरीही त्या मुलांबाबत सगळी माहिती ठेवतात. मुलांवर लक्ष ठेवणे ही निगेटिव बाब नसल्याचं स्वतः नीता अंबानी सांगतात. पालक म्हणून ही आपली जबाबदारी आहे. नीता अंबानी यांच्या या नियमांचे पालन आज त्यांची तिन्ही मुलं त्यांच्या खासगी जीवनातही फॉलो करत आहेत. 

मुलांसोबत खंबीरपणे उभे राहणे 

ईशा अंबानीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, नीता अंबानी कायमच तिच्या आणि दोन्ही भावंडांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. यामुळेच ईशा आजही करिअर आणि कुटुंब अतिशय चांगलेपणाने सांभाळत आहे. कायमच आईची खंबीर साथ या तिन्ही मुलांना मिळाली आहे.