नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत काश्मिरमधल्या (Kashmir) रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली. सार्वजनिक वाहतूक मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे लेह लडाखच्या (Leh Ladhakh) रस्त्याच्या कामात तब्बल पाच हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी हैदराबादमधील मेघा इंजिनिअरींग (MEIL) उल्लेख केला. MEILने अत्यंत कमी खर्चात प्रकल्पासाठी निविदा भरल्याने सरकारला याचा फायदा झाला. त्यामुळे नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात MEILची प्रशंसा केली.
काय म्हणाले नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेतील चर्चेत भाग घेताना देशातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भाष्य केलं. यात काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी जोझिला पास प्रकल्पाचा विशेष उल्लेख होता. अंदाजे 12,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी देशातील आणि परदेशातील अनेक नामांकित कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्याचे गडकरींनी सांगितलं.
गडकरी पुढे म्हणाले की, हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरींग कंपनीने ( MEIL ) अत्यंत कमी खर्चात या प्रकल्पासाठी निविदा भरल्याने केंद्र सरकारचे 5 हजार कोटी रुपये वाचले. अतिशय प्रतिकुल हवामानात जोझिला पासजवळ मेघा इंजिनीअरींग ( MEIL) वेगाने काम करत आहे.
दुहेरी बोगद्याच्या या बांधकामात दररोज प्रगतीचा एक टप्पा गाठला जातोय. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) या कंपनीने देशातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेउन ते वेळापत्रकाच्या अगोदर पूर्ण करण्याचा विक्रम नोदंवलाय. आज याची दखल संसदेत देखील घेण्यात आली. केवळ जलदच नाही तर सुरक्षितता आणि बांधकाम मानकांचे पालन करत दर्जेदार होत असलेल्या या कामाची अनेक प्रशासनीक अधिकाऱ्यांकडून कौतूक आणि प्रशंसा झाली आहे .