Budget 2023: ज्याची अपेक्षा नव्हती तेच झालं, बजेटच्या आधीच नितीन गडकरींची मोठी घोषणा!

Delhi mumbai expressway: यंदाच्या अर्थसंकल्पात जनतेला दिलासा देणार्‍या घोषणाही होऊ शकतात, अशी आशा जनतेला आहे. अर्थसंकल्पाला काही दिवस शिल्लक असताना आता नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Updated: Jan 25, 2023, 11:28 PM IST
Budget 2023: ज्याची अपेक्षा नव्हती तेच झालं, बजेटच्या आधीच नितीन गडकरींची मोठी घोषणा! title=
Nitin Gadkari,Budget 2023

Nitin Gadkari: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) येत्या 1 फेब्रुवारी रोजी पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा (Modi government) हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प (Full budget) आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात मोदी सरकार गोरगरिबांच्या हिताचा विचार करणार का?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. अशा स्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अर्थसंकल्पापूर्वीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. (Nitin Gadkari says sohna dausa section of delhi mumbai expressway to be inaugurated by end of january marathi news)

यंदाच्या अर्थसंकल्पात जनतेला दिलासा देणार्‍या घोषणाही होऊ शकतात, अशी आशा जनतेला आहे. अर्थसंकल्पाला काही दिवस शिल्लक असताना आता नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती (delhi mumbai expressway) महामार्गाच्या सोहना-दौसा विभागाचे (sohna dausa section) उद्घाटन जानेवारीच्या अखेरीस होईल, असं गडकरींनी सांगितलंय.

या महामार्गामुळे दिल्ली ते जयपूर (Delhi to Jaipur) प्रवासाचा वेळ कमी होईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांवर येणार आहे. दिल्ली आणि जयपूर दरम्यानचे अंतर सुमारे 270 किमी आहे. अशा परिस्थितीत प्रवासाचा वेळ दोन तासांवर आणल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आणखी वाचा - Budget 2023: अर्थसंकल्प म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला काय होतो फायदा?

दरम्यान, जानेवारी महिन्यात तुम्ही दिल्लीहून जयपूरला दोन तासात पोहोचाल, असंही गडकरी म्हणाले आहेत. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (delhi mumbai expressway) हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल आणि त्याची एकूण लांबी सुमारे 1,390 किमी आहे. हा एक्स्प्रेस वे पूर्ण तयार झाल्यावर दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासांमध्ये पूर्ण केलं जाऊ शकतं.