पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुजरात निवडणुकांबद्दल मोठा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यामध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी नीतीश कुमार यांनी हा अंदाज वर्तवला आहे.
गुजरातमध्ये भाजपचा कोणी पराभव नाही करु शकत. नरेंद्र मोदी यांच्या राज्यात भाजपला कोणताही धोका नाही आहे. यामुळे भाजपला आणखी बळ मिळालं आहे.
बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले की, गुजरात निवडणुकीबाबत त्यांचे मत पूर्णपणे स्पष्ट आहे. त्यांनी असेही सांगितले की लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रित करण्याबाबतही चर्चा आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींसोबत कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत चर्चा झाली आहे. सार्वजनिक मंचावरुन देखील त्यांनी अशा घटकांवर कारवाई बद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
नितीशकुमार म्हणाले की, आम्ही जाट आणि मराठा आरक्षणाचे समर्थन करतो. गुजरात निवडणुकीत पंतप्रधान त