पटणा : बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार हे बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीदरम्यान नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूची लालूप्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडी आणि काँग्रेसबरोबर युती आहे. पण लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि मुलगी मिशा यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं कारवाई केल्यामुळे नितीश कुमार यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असं लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं आहे.